Investment Tips : पैशांची गुंतवणूक करत आहात परंतु योजना फसवी तर नाही ना ? अशापद्धतीने ओळखा योजना फसवी आहे की उत्तम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Investment Tips:- कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक हा विषय तसे पाहायला गेले तर खूपच संवेदनशील असा विषय आहे. कारण पैशांची गुंतवणूक करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला फायदा काय होईल यापेक्षा केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील का?

हा प्रश्न महत्त्वाचा असतो व त्या दृष्टिकोनातून विचार करूनच गुंतवणूक करणे गरजेचे असते. आज-काल पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून अनेक गुंतवणूक योजना चालवल्या जातात व लालसेने व्यक्ती अशा योजनांमध्ये गुंतवणूक करते व त्यामध्ये खूप मोठे नुकसान होते व पैसा देखील आपला बुडतो.

त्यामुळे आपण कष्टाने कमवलेला पैसा चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते व त्या दृष्टिकोनातून चांगली गुंतवणूक योजनेचा विचार करणे महत्त्वाचे असते. परंतु नेमकी फसवी गुंतवणूक योजना व चांगली गुंतवणूक योजना यातील फरक आपण कसा ओळखू शकतो हा देखील एक मोठा प्रश्न आहे.

त्यामुळे आपण या लेखांमध्ये काही मुद्दे बघणार आहोत ज्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही गुंतवणूक योजना फसवी आहे की चांगली आहे याबद्दलचा अंदाज लावू शकतात.

फसव्या गुंतवणूक योजनांची ओळख कशी करावी?

1- जास्त परताव्याचे आमिष-

त्यामध्ये तुम्ही जर बँका किंवा एखाद्या वित्तीय संस्थेमध्ये जर गुंतवणूक केली तर अशा सरकारी किंवा खाजगी बँकांच्या माध्यमातून जो रिझर्व बँकेने दर ठरवून दिलेला असतो किंवा बँकेचा दर असतो त्यानुसारच व्याज दिले जाते. परंतु जर एखादी नवीन कंपनी किंवा व्यक्ती आले व तुम्हाला सांगायला लागले की आम्ही

तुम्हाला केलेल्या गुंतवणुकीवर खूप मोठा परतावा देऊ तर तुम्हाला ही गोष्ट कळायला पाहिजे की बँकांपेक्षा किंवा इतर वित्तीय संस्थांपेक्षा संबंधित कंपनीला किंवा व्यक्तीला जास्त परतावा देणे कसे काय शक्य आहे. याबद्दल तुम्ही विचार करणे गरजेचे आहे. म्हणजेच बँकांपेक्षा किंवा इतर अधिकृत वित्तीय संस्थांपेक्षा जर तुम्हाला जास्त परतावा मिळेल असं कोणी सांगत असेल तर तुम्ही वेळी सावध होणे गरजेचे आहे.

2- योजनांमध्ये इतरांना सहभागी करण्याचा आग्रह-

काही व्यक्ती आपल्याकडे येतात व गुंतवणूक करायला सांगतात व अशा माध्यमातून आपल्याला बऱ्याच वेळा काही दिवस परतावा देखील चांगला मिळतो. परंतु कालांतराने या कंपनीच्या सिस्टम मध्ये किंवा चेन मध्ये तुमच्या मित्रांना किंवा कुटुंबांना सहभागी करून घ्या असा आग्रह संबंधित कंपनी किंवा व्यक्तीकडून तुम्हाला धरला जातो. या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगितले जाते की

तुम्ही जितके जास्त व्यक्ती जोडाल तितका तुम्हाला जास्त परतावा मिळेल. तसेच अशा कंपनीच्या व्यक्तींकडून सेमिनार देखील आयोजित केले जातात व यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवायची कुठलीही गरज नाही फक्त ऐकायला या असं सांगितलं जातं. अशा प्रकारच्या कंपन्या किंवा व्यक्तींपासून दूर राहिलेलेच बरे.

3- केलेल्या गुंतवणुकीवर परताव्याची गॅरंटी-

तुम्ही कुठल्याही बँकेमध्ये किंवा वित्तीय संस्थेमध्ये जर गुंतवणूक केली असेल तुम्हाला किती परतावा मिळेल याची हमी देत नाहीत. तुम्हाला गुंतवणूक परताव्याच्या बाबतीत कायम नियमावली व इतर गोष्टीवर परतावा अवलंबून असतो असे सांगितले जाते.

परंतु या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही व्यक्ती किंवा कंपन्यांच्या माध्यमातून तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला इतक्या टक्के रिटर्न मिळेल किंवा परतावा मिळेल असं जर कोणी छातीठोकपणे सांगत असेल तर अशा व्यक्ती किंवा संस्थांपासून तुम्ही सावध राहिलेले बरे.

4- व्यक्तीची किंवा योजनेची विश्वासार्हता-

तुमच्या पर्यंत अशा योजना आणणारी व्यक्ती नेमकी कोण आहे किंवा तुमच्या भागात कधीपासून आहे? इत्यादी गोष्टी तुम्ही जाणून घेणे खूप गरजेचे आहे. तसेच त्या व्यक्तीची नोंदणी सेबी सोबत किंवा एखाद्या ब्रोकिंग फर्म्स किंवा वित्तीय संस्थांकडे आहे का? किंवा तुम्हाला जी काही गुंतवणूक योजना सांगितली जात आहे ती योजना सेबी,इर्डा इत्यादी कडे नोंदणीकृत आहे का?

इत्यादी गोष्टी तपासून घेणे गरजेचे आहे. एखाद्या व्यक्तीकडे कागद किंवा त्याचे लेटरहेड वगैरे किंवा शिक्का असेल तर यावर अजिबात विश्वास ठेवू नका कारण कोणते नोंदणी क्रमांक आहेत काही अगोदर तपासा. तसेच तुम्हाला गुंतवणुकीसाठी ऑफर देत असलेली व्यक्ती गुंतवणुकीची पद्धत आणि त्या गुंतवणुकी मधील धोके सांगत आहे का हे देखील तपासून बघणे गरजेचे आहे.

अशा पद्धतीने या सोप्या गोष्टींची अंमलबजावणी करून तुम्ही फसव्या गुंतवणूक योजना पासून वाचू शकतात व तुमचा पैसा देखील वाचवू शकतात.