Saffron Farming: महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्याने घरातील खोलीत घेतले केशरचे उत्पादन! केशर शेतीतून लाखो कमाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Saffron Farming:- तरुणाई म्हटले म्हणजे कायम विविध प्रयोग आणि भन्नाट व अचाट असे जगावेगळ्या गोष्टी करण्यासाठी कायम पुढे असतात. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि कुठलाही क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग करण्यामध्ये तरुणाई पुढेच असते. यामध्ये जर आपण शेती क्षेत्राचा विचार केला तर आता शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर तरुणांचा शिरकाव होताना दिसून येत असून पारंपारिक शेतीला फाटा देत या तरुणांनी अनेक वेगवेगळे प्रयोग करत शेती क्षेत्रामध्ये देखिल खूप मोठी प्रगती केली आहे.

पशुपालन व्यवसाय असो किंवा कुक्कुटपालन व्यवसाय यामध्ये आता तरुणांनी व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठी झेप घेतलेली आहे. घेतलेल्या शिक्षणाचा कौशल्याने शेतीत वापर करत हे तरुण आता शेतीचा विकास झपाट्याने करताना दिसून येत आहेत.

याच पद्धतीने जर आपण आदिवासी जिल्हा समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्याचा विचार केला तर या जिल्ह्यातील खेड दिगर येथील हर्ष पाटील या तरुणाने अभियांत्रिकी मध्ये शिक्षण घेतले व याचा वापर खूप कौशल्याने केशर लागवडीत केला. नंदुरबार सारख्या जिल्ह्यात केशर उत्पादन घेऊन या तरुणाने अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली आहे. याच तरुणाची यशोगाथा आपण या लेखात बघणार आहोत.

 अभियंता तरुणाने केशर शेती केली यशस्वी

याबाबत सविस्तर वृत्त असे की नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यातील खेड दिगर या छोट्या खेड्यात राहणाऱ्या हर्ष पाटील या तरुणाने शिक्षणाचा बहुमूल्य असा उपयोग करत नवीन तंत्रज्ञान आत्मसात केले व शेजारी असलेल्या 15 बाय 15 आकारमानाच्या खोलीमध्ये केशर उत्पादन घेण्याची किमया साध्य केली आहे.

केशर उत्पादनाकरिता जे काही थंड वातावरण लागते त्याची निर्मिती या तरुणाने 15 बाय 15 च्या खोलीतच केली. दोन ते अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये हर्ष पाटील यांनी केशर उत्पादनाचा प्रयोग यशस्वी केला आहे. खेड दिगर हे गाव शहादा तालुक्यात असून 700 ते 800 लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा गावामध्ये तंत्रज्ञानाच्या जोरावर हर्ष पाटीलने ही किमया करून दाखवली आहे.

हर्ष पाटील यांची शैक्षणिक पार्श्वभूमी पाहिली तर त्यांनी कॉम्प्युटर सायन्स मध्ये पदवी घेतली आहे. केशर लागवड करण्याआधी त्यांनी मोठ्या प्रमाणावर इंटरनेटच्या माध्यमातून याबद्दल माहिती घेतली. तेव्हा त्यांना कळाले की काश्मीर यासारख्या ठिकाणी केशर चे उत्पादन घेतले जाऊ शकते.

परंतु केशर शेतीचा सखोल अभ्यास केल्यानंतर त्यांनी नंदुरबार सारख्या भागात केशर उत्पन्न घेण्याची इच्छा बाळगली व त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केले. केशर लागवड करिता काश्मीर येथील मोगरा जातीच्या केशरचे फ्लॉवर कंद आणले व त्यांची लागवड करून केशर शेती करायला सुरुवात केली. फ्लॉवर कंद हर्ष पाटील यांनी श्रीनगर जवळ असलेल्या पाम्पोर येथून प्रति किलो 1000 रुपये या दराने आणले व घरात जवळ असलेल्या 15 बाय 15 च्या खोलीमध्ये लागवड केली.

 खोलीमध्ये अशाप्रकारे केली तयारी

घराजवळ असलेल्या 15 बाय 15 च्या खोली मध्ये त्यांनी केशर शेतीला सुरुवात केली व याकरिता तयारी म्हणून त्यांनी या खोलीमध्ये पूर्ण थर्माकोल चिकटवला व त्या दृष्टिकोनातून ही संपूर्ण खोली वातानुकूलित केली व 24 तास ते थंड राहील अशा प्रकारे काळजी घेतली. जर केशर चा एक सीड कंद लावला तर त्यापासून तीन महिन्यात तीन ते चार केशर निघते.

सीड कंदाचे वैशिष्ट्य म्हणजे एका सीड कंद पासून आठ ते दहा वर्षापर्यंत तुम्हाला उत्पन्न मिळत राहते व या एका सीड कंदापासून हळूहळू चार सीड कंद तयार होतात. अडीच ते तीन महिने केशर कंद लागवड करून झाले असून आतापर्यंत पाच लाख रुपयांचा खर्च हर्ष पाटील यांना आलेला आहे. या सीडला आता फुल बहरत असून एका फुलांमध्ये तीन केशर बाहेर निघत आहेत.

म्हणजेच हर्ष पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीला आता फळ मिळत असून यांचे केशरचे उत्पादन आता सुरू झाले आहे. 300 ग्रॅम पर्यंत उत्पादन मिळेल अशी शक्यता त्यांना आहे. जर केशरचे आज बाजारपेठेतील दर पाहिले तर एका ग्रॅमला पाचशे रुपयांचा दर असल्याचे देखील हर्ष पाटील यांनी नमूद केले.

हर्ष पाटील यांनी काश्मीर येथील टेक्निशियन टेक्नॉलॉजी यांच्याकडून माहिती घेत  घराजवळील खोलीमध्ये केशर सिडकंद घेऊन रोप लावलेले आहेत. साधारणपणे अडीच महिन्यानंतर आता त्यांना केशर चे उत्पन्न मिळायला लागलेले आहे. पहिल्या वर्षी याकरिता त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागला परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी त्यांना खर्च कमी परंतु उत्पन्न जास्त मिळणार आहे.

अशाप्रकारे हर्ष पाटील यांच्या उदाहरणावरून दिसून येते की तुम्ही जर शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली व कष्ट करण्याची तयारी ठेवली तर शेतीतून देखील लाखो रुपये कमवता येणे शक्य आहे.