जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत.

अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे. जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आव्हाड पोहोचले आहे. आव्हाड आणि शिंदेंच्या या भेटीचे कारण अद्यापही कळू शकले नाही.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये बैठक सुरू आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व नेते हजर आहे. ही बैठक सुरू असताना जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. आव्हाड आणि शिंदे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली असेल, असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे.