बातमी कामाची ! कमी व्याजदरात कर्ज हवे आहे का? मग करा हे एक काम, स्वस्तात अन तात्काळ Loan मिळणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Home Loan : आपल्यापैकी अनेकांना आपल्या वेगवेगळ्या गरजाची पूर्तता करण्यासाठी कर्जाची गरज लागते. यामध्ये घर बांधण्यासाठी, विकत घेण्यासाठी किंवा घराचे नूतनीकरण करण्यासाठी, वैयक्तिक गरजासाठी, वाहन किंवा लॅपटॉप व तत्सम महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्यासाठी प्रामुख्याने कर्ज घेतलं जातं. पण होम लोन, पर्सनल लोन किंवा वेहिकल लोन घेताना काही गोष्टींची पूर्तता करावी लागते. अर्ज घेताना बँकांकडून उत्पन्नाचे स्रोत तपासले जातात.

कर्जफेड करण्याची संबंधित व्यक्तीची पात्रता तपासले जाते. यासोबतच एक आणखी महत्त्वाचा घटक कर्ज मिळवण्यासाठी मोठी भूमिका बजावतो. ज्या लोकांचे उत्पन्नाचे स्रोत चांगले असतात त्यांना सहसा लवकरच कर्ज मिळतं. पण अनेकदा उत्पन्नाचे साधन चांगले असूनही एका कारणामुळे बँकांकडून कर्ज देण्यास विचार होतो. किंवा अधिक व्याज दरात कर्ज दिल जात. ते कारण म्हणजे खराब सिबिल.

हे पण वाचा :- मोठी बातमी ! ‘या’ महिन्यात होणार 30 हजार शिक्षकांची भरती; दीपक केसरकर यांची माहिती

वास्तविक सिबिल स्कोर किंवा क्रेडिट स्कोर हा असा घटक आहे ज्यामुळे व्यक्तीला कर्ज मिळण्यासाठी मदत होते, कमी व्याज दरात कर्ज मिळते. म्हणजे सिबिल स्कोर चांगला असेल तर कर्जदार व्यक्तीला लवकर कर्ज मिळत, शिवाय कमी व्याज राहत कर्ज मिळत असतं. पण जर हा स्कोर कमी असेल तर कर्ज नाकारला जातं किंवा उत्पन्नाचे स्रोत पाहून कर्ज मंजूर होत असलं तरीदेखील त्यावर अधिक व्याजदर आकारला जातो.

म्हणजेच चांगला सिबिल स्कोर ठेवणे कर्ज मिळवण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे सिबिल स्कोर किती पाहिजे? तर जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असला तर कोणत्याही प्रकारचे लोन मिळवण्यासाठी सोयीचे होते.

हे पण वाचा :- महिलांना तिकीट दरात 50% सवलतीच्या योजनेबाबत मोठी बातमी ! ‘या’ दिवसापासून सुरु होणार अंमलबजावणी?, पहा

खराब सिबिल स्कोर चा फटका

सिबिल स्कोर हा 300 ते 900 दरम्यान गणला जातो. हा स्कोर जेवढा कमी असतो तेवढा अधिक फटका कर्जदार व्यक्तीला बसतो. कमी स्कोर असला तर बँका वेहिकल लोन, होम लोन, पर्सनल लोन नाकारतात; किंवा या कर्जासाठी अडचणी निर्माण होतात. एवढेच नाही तर गोल्ड लोन म्हणजे सोने तारण ठेऊन कर्ज मिळवताना अशा व्यक्तींच्या कागदपत्रांची कठोर तपासणी केली जाते. यामुळे सिबिल स्कोर हा 750 पेक्षा अधिक असावा असे मत व्यक्त होत.

सिबिल स्कोर चांगला असल्याने होणारे फायदे

जर एखाद्या व्यक्तीचा सिबिल स्कोर चांगला असेल तर अशा व्यक्तीला लवकरच कर्ज मंजूर होतं शिवाय कमी व्याज दरात कर्ज मिळतं. या स्कोरच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीची आर्थिक परिस्थिती समजते. कर्ज परतफेडीची क्षमता यातून समजतं असते. तज्ञ लोक सांगतात की, 750 पेक्षा अधिक क्रेडिट स्कोर असेल तर अशा व्यक्तीला लवकर कर्ज मिळतं, व्याजदर कमी आकारला जातो. खराब सिबिल स्कोर असला तर साधारण दोन टक्के अधिक व्याजदर संबंधित व्यक्तीकडून आकारला जातो, अनेक प्रसंगी तर अशा व्यक्तींना कर्ज देखील नाकारल जाऊ शकत.

सिबिल स्कोर कसा सुधारायचा 

आता अनेकांना प्रश्न पडला असेल की हा स्कोर कसा सुधारला जाऊ शकतो. तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की, तुम्ही जर एखाद्या बँकेकडून किंवा वित्तसंस्थेकडून कर्ज घेतलं असेल तर त्या कर्जाची वेळेवर परतफेड करा. क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर भरा. क्रेडिट कार्ड ची लिमिट 30% पर्यंतच वापरा. Emi वेळेवर भरत चला. अनेक ठिकाणी कर्जांसाठी अर्ज करू नका. तुमचा emi हा तुमच्या वेतनाच्या 50% पेक्षा कमीच असावा.

हे पण वाचा :- Interesting Gk question : जगात असा कोणता प्राणी आहे ज्याला पाच डोळे आहेत?