MHADA News : मोठी बातमी ! म्हाडाकडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत; ‘या’ दिवशी सुरू होणार अर्ज, पहा ‘या’ सोडतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHADA News : म्हाडा कडून कोकण मंडळात 4752 घरासाठी सोडत जारी करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या सोडतीकडे नागरिकांचे लक्ष लागून होते. अखेरकार या सोडतीला मुहूर्त लाभला असून आता या घर सोडती प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार असून इच्छुक व्यक्तींना म्हाडाच्या नव्या नोंदणी प्रक्रियेच्या अंतर्गत अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की या घरात सोडतीसाठी म्हाडाकडून उद्यापासून अर्ज मागवले जाणार आहेत. यासाठी अनामत रक्कमसह अर्ज जमा करण्याचीं अंतिम दिनांक 20 मार्च निश्चित करण्यात आली आहे. वास्तविक कोकण मंडळाकडून या घर सोडतीसाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न केले जात होते. मात्र घर सोडतिला मुहूर्त लाभत नव्हता.

परंतु आता या लॉटरी संदर्भात कोकण मंडळाकडून मोठा निर्णय झाला असून या घर सोडतीचे संपूर्ण वेळापत्रक तयार झाले आहे. कोकण मंडळात म्हाडा कडून घर सोडत 11 एप्रिल रोजी काढली जाणार आहे. या दिवशी ठाणे येथील काशिनाथ घाणेकर नाट्यगृह या ठिकाणी सोडत जारी होणार आहे. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की या 4752 घरांमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 984 घरे, 20 टक्के योजनेंतर्गत 1 हजार 554 घरे, म्हाडा आवास योजनेंतर्गत 129 घरे आणि प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावरील 2 हजार 85 घरांचा समावेश राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या 4752 घरांमध्ये 984 घरे प्रधानमंत्री आवास योजनेचीं राहतील यामध्ये शिरढोण 340, खोणी 60, गोठेघर 256 आणि विरार-बोलिंगे या ठिकाणी 328 अशी एकूण 984 घर राहणार आहेत. या घरांची किंमत शिरढोण येथे 14 लाख 96,930 रुपये तसेच खोनी येथे 17 लाख 68,658 रुपये, गोठेघर येथे 17 लाख 15,164 रुपये आणि विरार बोलेंगे या ठिकाणी 21 लाख 15,706 रुपये याची किंमत निश्चित करण्यात आली आहे.

तसेच सोडतीमध्ये 20 टक्के योजनेतील 1,554 घरांचा देखील समावेश करण्यात आला आहे. म्हणजेचं 1,554 घरे ही म्हाडाला खाजगी विकासकांनी उपलब्ध करून दिली आहेत. वसई, विरार, ठाणे, पाचपाखाडी, डायघर, सानपाडा, घणसोली आदी भागातील खाजगी विकासाकांनी हे घरे म्हाडाला उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये अत्यंत कमी, लहान आणि मध्यम घरांचा देखील समावेश राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या ठिकाणी खाजगी विकासकांनी उपलब्ध करून दिलेल्या म्हाडाच्या या घरांची किंमत 7.5 लाख ते तीस लाख रुपये दरम्यान निश्चित करून देण्यात आली आहे.

या कोकण मंडळातील सोडतीत म्हाडाच्या प्रकल्पातील मात्र 129 घर राहणार आहेत. यामध्ये उच्च उत्पन्न गटातील घरांचा समावेश राहणार आहे. बाळकुम या ठिकाणी म्हाडाच्या प्रकल्पांतर्गत 3 उच्चवर्गीय घरांचा समावेश आहे. या उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत 60 लाख 60 हजार 688 रुपये एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्याचबरोबर विरार-बोळींजमधील अल्पसंख्याक गटातील 59 घरांचाही त्यात समावेश असून ही घरे 28 लाखांना म्हाडा कडून नागरिकांना दिली जाणार आहेत. आता आपण या घर सोडत प्रक्रिया संदर्भातील काही महत्त्वाच्या तारखा जाणून घेणार आहोत.

खरं पाहता यासाठी पाच जानेवारीपासून नोंदणी सुरू झाली आहे. मात्र अर्ज प्रक्रिया 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. 20 मार्च 2023 पर्यंत या घर सोडतीसाठी अनामत रकमेसह अर्ज सादर करता येणार आहेत. जे अर्ज स्वीकृत होतील त्यांची प्रारूप यादी 29 मार्चला जारी होणार आहे. तसेच जे अर्ज स्वीकृत केले जातील त्यांची अंतिम यादी पाच एप्रिल ला जारी केली जाणार आहे.