मोठी बातमी ! म्हाडाच्या नियमात झाला ‘हा’ मोठा बदल; कोकण मंडळाच्या लॉटरीपासून नवीन नियम लागू, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mhada News : मुंबई पुणे औरंगाबाद नासिक यांसारख्या महानगरात म्हाडाच्या माध्यमातून घरांची लॉटरी काढली जाते. या महानगरात घरांच्या किमती दिवसेंदिवस महागत असल्याने सर्वसामान्य नागरिक म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 4654 घरांसाठी लॉटरीची जाहिरात 6 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया या आधीपासूनच सुरू झाली आहे.

दरम्यान या लॉटरीचे अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया आठ मार्च रोजी म्हणजेच आजपासून सुरू होणार आहे. आज दुपारी बारा वाजे नंतर लॉटरीची अर्ज विक्री आणि स्वीकृती सुरू होईल. मात्र कोकण मंडळाच्या या घर सोडतीसाठी अर्ज करताना नागरिकांना थोड सतर्क देखील राहावं लागणार आहे. कारण की कोकण मंडळाने आपल्या नियमात बदल केला आहे.

या घरसोडती साठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार आता म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत विजेत्या झालेल्या नागरिकांनी जर घर परत केलं म्हणजेच घर नाकारलं तर त्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे. या अशा घर नाकारणाऱ्या प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेअंतर्गत विजेत्यांना आपल्या अनामत रकमेपैकी एक रुपया देखील परत मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.

कोकण मंडळाने हा निर्णय घेतला असून जाहिरातीत याबाबत स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या नागरिकांना विचार करूनच अर्ज करावा लागणार आहे. म्हणजेच प्रथम येणाऱ्यासं प्राधान्य या योजनेअंतर्गत ज्या घरासाठी अर्ज केला आहे ते घर विजेत्यांना घ्यावच लागेल नाही तर मग अनामत रकमेसं मुकावं लागणार आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की कोकण मंडळातील या घर सोडतील विरार बोळींचे मधील 2048 घरांचा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेत समावेश करण्यात आला आहे. ही घरे अनेकदा म्हाडाच्या लॉटरीत समाविष्ट करण्यात आली मात्र यांची विक्री न झाल्याने ही घरी आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेत टाकण्यात आली आहेत.

दरम्यान आता, कोकण मंडळांने या घर सोडतीसाठी ‘प्रथम प्राधान्य’ योजनेत विजयी ठरणाऱ्यांनी घर नाकारल्यास त्यांना अनामत रक्कम परत मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या 2048 घरांमध्ये अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी अनामत रक्कम 50 हजार रुपये आहे तर मध्यम उत्पन्न गटासाठी 75 हजार रुपयांना मात्र रक्कम ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या योजनेत विजयी ठरल्यावर घर नाकारणाऱ्यांना अनामत रकमेवर पाणी सोडावे लागणार आहे.

पण इतर म्हाडा गृहनिर्माण, 20 टक्के आणि पीएमएवायमधील घरांसाठीच्या सोडतीमधील विजेत्यांनी घरे नाकारल्यास त्यांची केवळ एक टक्के अनामत रक्कम कपण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. एकंदरीत कोकण मंडळाच्या या चार हजार 654 घर सोडतीसाठी प्रथम येणाऱ्यासं प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या 2048 घरांसाठी अर्ज करताना नागरिकांना काळजीपूर्वक आणि विचार करून अर्ज सादर करावयाचा आहे. म्हणजे त्यांना घर घ्यायचं असेल तरच अर्ज करणे आवश्यक आहे.