पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! अवकाळी पावसाचा मुक्काम लांबला, आणखी ‘इतके’ दिवस पाऊस पडणार; पहा काय म्हटले डख…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगर, सांगली, सातारा, बीड, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक यासह बहुतांशी जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. म्हणजेच राज्यातील मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच कोकणातील बहुतांशी भागात अवकाळी पावसाने थैमान माजवले आहे.

यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शहरी भागात जनजीवन विस्कळीत होत आहे, तसेच बहुतांशी ठिकाणी वाहतूक कोंडी देखील होत आहे. अशातच राज्यात पुढील चार दिवस भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा नवीन अंदाज समोर आला आहे. शिवाय राज्यातील काही भागात तापमान देखील वाढत असून यामुळे उकाडा जाणवू लागला आहे.

हे पण वाचा :- भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा; आता ‘या’ जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस !

अशातच आता शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आणि आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकिक कमावलेल्या पंजाबराव डख या हवामान तज्ज्ञांचा अंदाज समोर आला आहे. डक यांनी नुकतीच एक मोठी माहिती दिली आहे. ते म्हटले की, राज्यात 18 एप्रिल पासून म्हणजे आजपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस पडणार आहे. 18 एप्रिल, 19 एप्रिल आणि 20 एप्रिल रोजी राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात पावसाची शक्यता राहणार आहे.

या कालावधीत पडणारा पाऊस मात्र भाग बदलत पडणार आहे म्हणजेच सर्वत्र पाऊस पडणार नाही. निश्चितच यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. पंजाबरावांचा हा अंदाज जर पुन्हा खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. वास्तविक गेल्या काही वर्षांपासून पंजाब रावांनी वर्तव्येला हवामान अंदाज हा तंतोतंत खरा ठरत आहे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांनो काळजी घ्या ! ‘हा’ हलगर्जीपणा केला तर बसणार मोठा दंड, आता पोलीस कार्यालयात येऊन करणार कारवाई; पहा….

गेल्या महिन्यात आणि या चालू महिन्यात त्यांनी वर्तवलेला हवामान अंदाजही खरा ठरला आहे. यामुळे हा देखील अंदाज खरा ठरणार असल्याचे चित्र असून पुन्हा पाऊस पडला तर शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका बसणार आहे. एकंदरीत एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाचा मुक्काम आता लांबला आहे आणि 20 एप्रिल पर्यंत राज्यात पावसाची शक्यता राहणार आहे.

याव्यतिरिक्त मे महिन्यात हे पावसाची शक्यता आहे. मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात, म्हणजे 5 मे आणि सहा मे च्या दरम्यान पाऊस पडेल असं मत पंजाबराव यांनी व्यक्त केल आहे. याशिवाय 15 आणि 16 मे ला देखील राज्यात पाऊस पडणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. एकंदरीत डखं यांनी वर्तवलेला हा अंदाज जर खरा ठरला तर शेतकऱ्यांच्या पुढ्यात आणखी एक संकट उभे राहणार असून रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फारसे उत्पन्न मिळणार नाही असे चित्र आहे.

हे पण वाचा :- मुंबई, पुणेकरांना ‘या’ पालिकेच्या निर्णयामुळे बसतोय मोठा फटका ! डेक्कन क्वीनला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात थांबा नाही, प्रकरण काय? पहा….