पुणे-अहमदनगर-औरंगाबाद महामार्गसाठी आवश्यक निधीची झाली अर्थसंकल्पात तरतूद ; आता ‘या’ गावात होणार भूसंपादन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Aurangabad Expressway : पुणे अहमदनगर औरंगाबाद महामार्गाबाबत एक मोठ अपडेट हाती आलं आहे. खरं पाहता नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या महामार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याची माहिती जाणकार लोकांनी दिली आहे. त्यामुळे हा महामार्ग लवकरच मार्गी लागणार असल्याचे चित्र तयार होत आहे.

आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की हा महामार्ग नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जाणार आहे. या महामार्गाची लांबी 270 किलोमीटर एवढी राहणार असून हा महामार्ग पुणे अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातुन जाणार आहे.

हा महामार्ग सहा पदरी राहणार असून याची रुंदी 70 मीटर एवढी राहील अशी माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महामार्गासाठी 5000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाची सुरुवात पुणे येथील रिंगरोड पासून होणार असून त्याचा शेवट हा औरंगाबाद येथील शेंद्रा एमआयडीसी येथे होणार असून हा महामार्ग शेंद्रा एमआयडीसीच्या ठिकाणी समृद्धी महामार्गाला कनेक्ट होणार आहे. 

या गावातून जाणार हा मार्ग

औरंगाबाद जिल्ह्यातील या गावातून जाणार हा मार्ग 

औरंगाबाद तालुका :- सुंदरवाडी, जलता, आडगाव बिके,चिंचोली, घरदोन, हिरापूर

पैठण तालुका– वरवंडी खुर्द, पारगाव, डोणगाव, बालानगर, कापूवारी, वरुडीबीके, वावा, वडाळा, पाचलगाव, नारायणगाव, करंजखेडा, आखातवाडा, वाघरी, दादेगाव जहांगीर, पाटेगाव, सायगाव, पैठणी एम.सी.

अहमदनगर जिल्ह्यातील या गावातून जाणार हा मार्ग 

शेवगाव तालुका– खडके, मडके, चापडगाव, वरखेड, हसनापूर, मुरशतपूर, प्रभू वडगाव, सोमठाणे आणि डोंगर आखेगाव

श्रीगोंदा तालुका– हिंगणी दुमला, देव पैठण आणि वाकरेवाडी

पारनेर तालुका– पाडळी रांजणगाव, बाबुर्डी,कडूस, रुई छत्रपती, पिंपरी गवळी, रायतळे, सारोळा कासार आणि आष्टी गाव

नगर तालुका– उक्कडगाव, दगडवाडी, मराठवाडी, भातोडी पारगाव, दशमी गव्हाण आणि बाबुर्डी घुमट

पाथर्डी तालुका– प्रभू पिंपरी, सैदापूर, दागेवाडी, तिसगाव, निवडुंगे, देवराई आणि शिरापूर

पुणे जिल्ह्यातील या गावातून जाणार हा मार्ग 

भोर तालुका– वरवे बुद्रुक, शिवरे, कासुर्डी क.भा., कासुर्डी गु. एम.एसस्सी., मौजे कांजळी

हवेली तालुका– तरडे, वळती, आळंदी महतोबाची, शिंदवणे, सोरतापवाडी, हिंगणगाव, भवरपुर आणि कोरेगाव मुल

पुरंदर तालुका– कोडीत खुर्द, वरवडी, थापेवाडी, गराडे, चांबळी, सासवड, पवारवाडी, हिवरे, दिवे, सोनोरी आणि काळेवाडी

दौंड तालुका– मिरवाडी

शिरूर तालुका– गोळेगाव, चव्हाणवाडी, देवकरवाडी, पिलनवाडी, पाटेठाण,तेलवारी, वडगाव बांडे, राहू, टाकळी व पानवली, उरळगाव, सातकरवाडी, दहिवडी, आंबडे, कोरडे, बाबूळसर खुर्द, रांजणगाव गणपती आणि कारेगाव

Ahmednagar Breaking : खुशखबर ! अहमदनगर जिल्ह्यासाठी अतिमहत्त्वाच्या अशा ‘या’ तीन महामार्गांची कामे लागणार मार्गी ; बजेटमध्ये मंजूर झाला निधी