कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Farmer : राज्यात सोयाबीन कापूस आणि कांदा या तीन पिकांची सर्वाधिक लागवड पाहायला मिळते. या तीन नगदी पिकांच्या शेतीवर राज्यातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक मदार पहावयास मिळतो. पण गत दोन वर्षांपासून कांदा या नगदी पिकामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

यंदा देखील बाजारात कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने बळीराजा कर्जबाजारी होण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. विशेष म्हणजे यंदा कापूस आणि सोयाबीन या मालाला देखील बाजारात चांगला भाव नसल्याने मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी अडचणीत आले आहेत.

हे पण वाचा :- राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क अन अधिकारीची पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच भरली जाणार?

दरम्यान पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्याने कांद्याच्या बाजारभावातला हा लहरीपणा ओळखत एक वेगळा प्रयोग केला आहे. जिल्ह्यातील लोणी वाळुंज येथील जयेश वाळुंज या तरुण शेतकऱ्याने कांदा बीज उत्पादनाचा प्रयोग आपल्या शेतात राबवला आहे. आता जयेश यांचा हा प्रयोग यशस्वी ठरला असून कांद्याचे बियाणे तयार झाले आहे. बियाणे दर्जेदार असल्याने याला चांगली मागणी देखील आहे. जयेश यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी कांद्याला कमी भाव मिळतो म्हणून कांदा बीज उत्पादन करायचे असे ठरवले.

हे पण वाचा :- मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ महिन्यात पूर्ण होणार मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे काम; एमएमआरडीएने थेट तारीखच सांगितली

यासाठी त्यांनी अकरा गोणी चांगला कांदा 15 रुपये प्रति किलो या भावात विकत आणला. यानंतर जमिनीची मशागत करण्यात आली आणि कांदा बिजोत्पादनसाठी कांद्याची लागवड झाली. लागवडीनंतर ठिबक सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन झाले तसेच विद्राव्य खते देखील ठिबकने देण्यात आली. या बियाण्यासाठी लावलेल्या कांद्याला आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी भरले. सध्या हा प्लॉट 86-87 दिवसाचा झाला आहे. यातून पुढील एका महिन्यात बियाणं मिळेल असं त्यांनी सांगितल आहे.

हे पण वाचा :- पंजाबरावांचा हवामान अंदाज पुन्हा ठरला खरा ! पावसाला सुरवात; आजपासून ‘या’ जिल्ह्यात ‘इतके’ दिवस मुसळधार पाऊस अन गारपीट, पहा डख काय म्हटले

एकंदरीत बाजारात कांदा कवडीमोल दारात विक्री होत असल्याने या युवा उद्योजक शेतकऱ्याने केलेला हा प्रयोग फायदेशीर ठरत आहे. त्यांच्या बियाण्याला चांगली मागणी असून कृषी क्षेत्रात मिळवलेली पदवी त्यांच्या कामी येत आहे. यासाठी त्यांना जवळपास 25 ते 30 हजार रुपयाचा उत्पादन खर्च आला असून 60 किलो पर्यंतचे कांदा बियाणे त्यांना यातून मिळणार आहे. निश्चितच, कांदा लागवड करण्याऐवजी कांदा बियाणे उत्पादित करून या युवक उद्योजक शेतकऱ्याने इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 18 महिने थकीत महागाई भत्ताबाबत शासनाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, पहा….