Soyabean Farming : बातमी कामाची ! सोयाबीनचे टॉपचे वाण कोणते, कोणत्या जातीला लागतात सर्वाधिक शेंगा? पहा ‘ही’ महत्त्वपूर्ण माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soyabean Farming : सोयाबीन हे भारतात उत्पादित केल जाणार एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. एका आकडेवारीनुसार भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश या राज्याचा 45 टक्के एवढा वाटा आहे तर आपल्या महाराष्ट्राचा 40% एवढा वाटा आहे.

एकंदरीत महाराष्ट्रात सोयाबीनची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते आणि राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे. शाश्वत उत्पन्न देणारे हे पीक असल्याने शेतकऱ्यांची या पिकाला कायमच पसंती राहिली आहे. वास्तविक या पिकाची खरीप हंगामात शेती केली जाते. सद्यस्थितीला खरीप हंगामातील सोयाबीनची बाजारात आवक देखील होत आहे.

दरम्यान अलीकडील काही काळात या पिकाची उन्हाळी हंगामात देखील लागवड केली जाऊ लागली आहे. प्रामुख्याने बीजोत्पादनासाठी उन्हाळी हंगामात याची शेती केली जाते. खरं पाहता कोणत्याही इतर पिकांप्रमाणेच या पिकाच्या शेतीतूनही अधिकचे उत्पादन मिळवण्यासाठी याच्या सुधारित जातींची पेरणी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला जातो. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या टॉपच्या जाती नेमक्या कोणत्या आहेत याविषयी जाणून घेणार आहोत.

एम ए यु एस 612 :- सोयाबीनचे हे एक सुधारित वाण आहे. या जातीची महाराष्ट्रात पेरणी मोठ्या प्रमाणात होते. राज्यातील अग्रगण्य कृषी विद्यापीठापैकी एक वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांनी ही जात विकसित केली आहे. महाराष्ट्रासाठी ही जात शिफारशीत आहे. हे वाण पेरणी केल्यानंतर 93 ते 98 दिवसात उत्पादन देण्यासाठी तयार होत असते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे कमी ओलावा असला तरीही या जातीचे पीक तग धरून राहते. तसेच या जातीच्या पिकातील शेंगा तडकत नाहीत. यामुळे उत्पादनात घट होत नाही. अजून एक मोठी विशेषता म्हणजे यां वाणाचे पीक हार्वेस्टरच्या माध्यमातून काढले जाऊ शकते.

ए एम एस – 1001 (पीडीकेव्‍ही येलो गोल्ड) :- या वाणाची निर्मिती देखील महाराष्ट्राच्या कृषी विद्यापीठात झाली आहे. महाराष्ट्रातील अग्रगण्य कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी या वाणाची निर्मिती झाली आहे. हे वाण 2018 साली महाराष्ट्रासाठी प्रसारित झाले आहे. कृषी तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे वाण 38 ते 40 दिवसात फुलोरा अवस्थेत येत असते. तसेच पेरणी केल्यानंतर 95 ते 100 दिवसात या जातीपासून उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. असा दावा केला गेला आहे की या जातीपासून हेक्टरी 22 ते 26 क्विंटल सोयाबीनचा उतारा मिळतो. तेलाचा उतारा या जातीचा 19 ते 19.5 टक्के एवढा राहतो. विशेष म्हणजे 100 दाण्याचे वजन 10.5 ते अकरा ग्रॅम एवढे असते. निश्चितच महाराष्ट्राच हवामान या जातीसाठी मानवत यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसाठी या जातीची पेरणी करणे फायदेशीर ठरते.

फुले संगम (के डी एस 726) :- महाराष्ट्रात सर्वाधिक पेरले जाणार वाण म्हणून फुले संगम ही जात शेतकऱ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. राज्यातील हवामानात चांगले तग धरून राहते आणि चांगले उत्पादन या जातीपासून मिळते. हा देखील वाण महाराष्ट्रातील एक अग्रगण्य कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 2016 मध्ये दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता हे वाण शिफारशीत करण्यात आले आहे. या वाणाची सर्वात मोठी विशेषता अशी की, हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा आहे. यामुळे शेतकरी बांधवांना कमी प्रमाणात उत्पादन खर्च येतो. उत्पादन देखील अधिक मिळते. पेरणी केल्यानंतर साधारणपणे 100 ते 105 दिवसात हे वाण काढण्यासाठी तयार होत असते. या जातीपासून 23 ते 25 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढ उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून या जातीची महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होत असून यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन देखील मिळत आहे.

फुले किमया (के डी एस 753) :- ही देखील सोयाबीनची एक सुधारित जात असून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी स्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या जातीची निर्मिती केली आहे. हे वाण 2017 दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केली आहे. यादेखील जातीची आपल्या महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेती केली जात असून शेतकऱ्यांमध्ये हे देखील वाण लोकप्रिय आहे. जाणकार लोकांच्या मते पेरणी केल्यानंतर 95 ते 100 दिवसांत या जातीपासून उत्पादन मिळू लागते. या जातीपासून शेतकरी बांधवांना 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढ उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो. निश्चितच देखील सोयाबीन वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

सोयाबीन के. एस. 103 :- सोयाबीनचं हे प्रगत वाण असून यां जातीची निर्मिती महात्मा फुले कृषी विद्यापीठाने केली आहे. हे वाण महाराष्ट्रात अलीकडेच विकसित झालेलं एक लोकप्रिय वाण आहे. 2018 मध्ये दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना तामिळनाडू आंध्र प्रदेश व इतर काही राज्यासाठी हे प्रसारित झाले आहे. या जातीची पेरणी केल्यानंतर 95 ते 100 दिवसांत यापासून शेतकऱ्यांना उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. यापासून 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढ उत्पादन मिळत असल्याचा दावा जाणकार लोकांनी केला आहे. निश्चितच या जातीची पेरणी ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे.