State Employee News : ब्रेकिंग ! ‘त्या’ राज्य कर्मचाऱ्यांचे ‘इतक्या’ दिवसाचे वेतन कापणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : 2022 हे वर्ष राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय निराशाजनक असं राहिल आहे. गेल्या वर्षी राज्य कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागणीसाठी राज्य कर्मचाऱ्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलने पुकारली होती त्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत.

त्यामध्ये सर्वात मोठी मागणी ओ पी एस अर्थातच जुनी पेन्शन योजनेसंदर्भात होती. राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस योजना लागू व्हावी अशी मागणी केल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. मात्र डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारने राज्यातील कर्मचाऱ्यांना ओपीएस लागू होणार नाही असे स्पष्ट केलं.

त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची मोठी निराशा झाली. दरम्यान एसटी महामंडळ अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठी धक्कादायक अशी माहिती समोर येत आहे.

खरं पाहता आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी महामंडळातील कर्मचारी वारंवार आंदोलने करत असतात. अनेकदा संप देखील केला जातो. साडेचार वर्षांपूर्वी देखील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पगार वाढी संदर्भात संप पुकारला होता. आता या संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात मोठ अपडेट हाती आल आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार या संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात केली जाणार आहे.यां संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांचे डिसेंबर महिन्यातील जे पेमेंट असेल म्हणजेच जे पेमेंट जानेवारी महिन्यात मिळेल त्यामधून कपाय करण्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयाने 4 जानेवारी 2023 च्या पत्रानुसार महामंडळाला केल्या आहेत.

यानुसार एका दिवसाकरिता दोन दिवसांचे पेमेंट कापलं जाणार आहे.आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की पगार वाढीच्या अनुषंगाने एसटी कर्मचाऱ्यांनी आठ व नऊ जून 2018 रोजी संप केला होता. या संपात सामील झालेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा पगार कपात केला जावा असे आदेश मुंबई औद्योगिक न्यायालयाने दिले होते.

यातं एका दिवसाची जर गैरहजेरी असेल तर दोन दिवसाचा पेमेंट कपात करावा असे आदेश निर्गमित झाले होते. निश्चितच आधीच एसटी कर्मचाऱ्यांचा पीएफ आणि ग्रॅज्युटीच्या ट्रस्टमध्ये जो पैसा टाकावा लागतो तो शासनाकडून वेळेत निधी मिळत नसल्याने थकलेला आहे. अशा परिस्थितीत आता संपात सामील झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनां पेमेंट कपातीचा फटका देखील बसणार आहे.