लग्न दुसऱ्यांचे लाखो रुपये कमवाल तुम्ही ! ‘हे’ चार बिझनेस म्हणजे पैसे छापण्याची मशीन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Business Ideas : तुम्ही सिझनेबल बिझनेस करता का? किंवा तुम्हाला सिझनेबल व्यवसाय करायचे आहेत का? असे असेल तर आम्ही तुम्हाला आता याठिकाणी आगामी काही दिवसांत मोठी डिमांड येणारे काही बिझनेस याठिकाणी आम्ही देणार आहोत.

ते करून तुम्ही प्रचंड पैसे आगामी तीन ते चार महिन्यांतच कमावू शकता. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की, आज कार्तिकी एकादशी झाली. म्हणजे आता तुलसी विवाह असेल. ते झालं की लगेच लग्न समारंभांना सुरुवात.

आपल्याकडे लग्न तिथी आणि असणारे लग्न किती चिक्कार असतात हे वेगळे सांगायला नको. तर या लग्न समारंभासंदर्भात काही बिझनेस आयडिया आम्ही तुम्हाला याठिकाणी सांगणार आहोत. चला त्याबद्दल जाणून घेऊयात त्याबद्दल –

* यात पहिला व्यवसाय तुम्ही करू शकता मॅरेज पॅलेसचा

तुम्ही एक मॅरेज पॅलेसबांधला तर तुम्ही यातून या व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवू शकता. तुम्ही स्वतःच्या जागेवर ते बांधू शकता किंवा एखादी जागा करारावर घेऊन त्याठिकाणी तुम्ही ते बांधू शकता.

येथे तुम्हाला विवाहसोहळा आयोजित करता येईल. तुमची स्वतःची जागा असेल तर कमी खर्च येईल. येथे व्यवस्थित सेट अप केला की, तुम्हाला मार्केटिंग करावी लागेल. परंतु आज जागेसाठी असणारे भाडे जर पाहायला तर तुम्ही लग्नाच्या सीझनमध्ये १० ते १५ लाख रुपये आरामात कमाऊ शकता.

* दुसरा व्यवसाय करू शकता केटरिंगचा

अलीकडील काळात केटरिंग व्यवसाय हा अत्यंत जोमाने वाढत आहे. हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर व्यवसाय ठरू शकेल. दरवर्षी लाखो विवाह होतात. या समारंभात केटरिंगची गरज असते.

तुम्ही उत्तम स्वयंपाक आणि उत्तम जेवण दिले तर तुम्ही नक्कीच तुमचा व्यवसाय जास्त फोफावू शकता. यासाठी तुम्ही जवळच्या मॅरेज हॉल असणाऱ्यांशी संपर्क करू शकता. यात तुम्ही काहींना कमिशन येऊन त्यांच्याकडून कस्टमर देऊ शकता.

* भाड्याची वाहने

जेव्हा एखादे लग्न असते तेव्हा लोक किंवा त्या कुटुंबातील लोक हे वाहनांनी प्रवास करतात. यावेळी प्रत्येकाकडे वाहने असतंच असे नाही. यावेळी भाड्यानी वाहने केले जातात. जर तुम्ही देखील अशीच वाहने भाड्याने देण्याचा व्यास सुरु केला तर तुम्हाला नक्कीच जास्त फायदा मिळू शकतो. असा व्यवसाय करणारे अनेक लोक आहेत, जे आज आयुष्यात सक्सेस झाले आहेत.

* आणखी महत्वाचा व्यवसाय म्हणजे डीजे बिझनेस

लग्न असो किंवा इतर कुठलाही समारंभ, तिथे डीजे असतोच. डीजे लावणे म्हणजे कार्यक्रमाची शोभा वाढवणे असे मानले जाते. लग्नाच्या मोसमात हा व्यवसाय खूप फोफावतो. हा व्यवसाय केवळ लग्न सिझन पुरता नाही तर 12 महिने चालणार

हा बिझनेस आहे असे म्हटले जाते. कारण सध्या वाढदिवस असो कि पार्टी प्रत्येक ठिकाणी डीजे लावला जातो. या व्यवसायात तुम्ही सुरवातीला ३ ते ४ लाख रुपये जर गुंतवले तर तुम्ही यातून वर्षभरात डबल तीबद्दल पैसे कमावू शकता.