Soybean Bajar Bhav : कांद्याचे बाजार भाव वधारले पण सोयाबीन दराला आजही ग्रहण ! सोयाबीन बाजारभाव पाच हजाराच्या आत, वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajar Bhav : आज राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. कांद्याच्या दराने तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. मात्र सोयाबीन बाजारभाव (Soybean Bajar Bhav) अजूनही पाच हजाराच्या आतच फसले आहेत.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Farmer) चिंता वाढली आहे. बाजारात नवीन सोयाबीन दाखल होताच व्यापाऱ्यांनी बाजारभाव (Soybean Rate) हाणून पाडले आहेत. शेतकऱ्यांच्या मते नवीन सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत व्यापारी नवीन सोयाबीनला (Soybean Crop) कवडीमोल बाजार भाव (Soybean Market Price) देत आहेत.

दरम्यान जुना सोयाबीन देखील पाच हजाराच्या आसपासच असल्याने सोयाबीन उत्पादक चिंतातुर आहेत. सध्या राज्यात परतीचा पाऊस चांगलाच कोसळत असल्याने सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीनच्या उत्पादनात घट होणार आहे. अशा परिस्थितीत उत्पादनात घट आणि बाजार भावात आलेली ही कमी शेतकरी बांधवांच्या उत्पन्नात घट घडवून आणणार आहे.

मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजार भावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (apmc) सोयाबीनला मिळालेल्या बाजारभावाची विस्तृत चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव सविस्तर.

माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- माजलगाव एपीएमसीमध्ये आज 1455 क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली आहे. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आ सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 177 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 775 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला.

तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- तुळजापूर एपीएमसी मध्ये आज 650 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव देखील चार हजार 950 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मोर्शी कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 965 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 525 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- नगर जिल्ह्यातील राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 85 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार तीन रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज तीन हजार 45 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 280 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 865 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज 800 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 135 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4817 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज एक हजार 530 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 700 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज सोयाबीनची 2708 क्विंटल आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 55 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 350 रुपये प्रति क्विंटल नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 469 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 55 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 877 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 1294 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4175 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4538 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

बीड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये 176 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 4567 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 4500 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

वाशिम-अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 600 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 150 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली खानेगाव नाका कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 331 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 550 रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज चार हजार 380 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल नमूद झाला आहे.

मुरूम कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 575 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार 50 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 875 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात आज 240 क्विंटल आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 100 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.