Soybean Bajarbhav : चिंताजनक! आज पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण, प्रमुख बाजार समितीतील आजचे सोयाबीन बाजारभाव जाणून घ्या

Soyabean Production

 

Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या दरात (Soybean Market Price) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण नमूद केली जात आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी सहा हजार रुपये प्रति क्विंटल दराने विक्री होणारा सोयाबीन (Soybean Crop) गेल्या काही दिवसांपासून पाच हजार रुपये प्रति क्विंटल वर येऊन ठेपला आहे.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Soybean Grower Farmer) काळजाची धडधड देखील वाढली आहे. मित्रांनो आगामी काही दिवसात नवीन सोयाबीन बाजारात दाखल होईल अशा परिस्थितीत सोयाबीनला चांगला बाजारभाव (Soybean Rate) मिळेल का हा मोठा प्रश्न आता शेतकऱ्यांना (Farmer) भेडसावत आहे.

दरम्यान आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) सोयाबीनला मिळालेल्या बाजार भाव विषयी आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया आजचे सोयाबीन बाजार भाव.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये 800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 145 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 1452 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार 51 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 249 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार वीस रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 840 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज चार हजार 71 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 450 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज सोयाबीनला या ठिकाणी मिळाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये 799 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये पाच हजार 165 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 650 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 140 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 60 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसी मध्ये 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. चार हजार 880 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला मिळाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसीमध्ये 410 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 155 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 850 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.

मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समिती:- मलकापूर एपीएमसीमध्ये आज 151 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 50 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच चार हजार 350 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजारभाव सोयाबीनला आज या एपीएमसीमध्ये मिळाला आहे.