पारनेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस

पारनेर तालुक्यातील पाडळी दर्या परिसरात काल दुपारी पावणेदोन वाजता तुफान वारा व ढगांच्या जोरदार गडगडाटास जोरदार पाऊस झाल्याने आंब्याच्या झाडांवरील कैऱ्या व चिकूच्या झाडावरील चिकू पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यातील उष्णतेने अंगाची लाही लाही होत होती. दरम्यान, अक्षय तृतीया या हिंदू धर्मातील पवित्र दिवशीच दुपारी पावणे दोन वाजता अचानकपणे झाकाळून येवून … Read more

Kharif Season 2024 : शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात १५ भरारी पथके

खरीप हंगाम २०२४ साठी यंदा शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व दर्जेदार निविष्ठांचा वेळेत व वाजवी दरामध्ये पुरवठा होण्याचे कृषि विभागाने नियोजन केले आहे. जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ यांच्या सुचनेनुसार जिल्ह्यात निविष्ठा उपलब्धता तक्रार निवारण कक्षांची स्थापना करण्यात आली आहे. १५ भरारी पथकांमार्फत निविष्ठा विक्रेत्यांची अचानक तपासणी केली जाणार आहे. शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्धतेमध्ये अडचण उद्भवल्यास तक्रार निवारण कक्षाशी संपर्क … Read more

Ahmednagar Rain : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली ! उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा

कोपरगाव तालुक्यात घारी, चांदेकसारेसह परीसरात १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पावसाने हजेरी लावली असून अर्धा पाऊण तास जोरदार वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र निर्माण झाले. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेले असल्यामुळे उष्णतेने व उकाड्याने नागरिक हैराण झाले होते. … Read more

मोठयाचं पोरगं एवढीच भाजपा उमेदवाराची गुणवत्ता ! बाळासाहेब थोरात यांचे टीकास्त्र

समोरच्या उमेदवाराने पाच वर्षाच्या खासदारकीच्या कार्यकाळात काय काम केेले ? किती फिरले ? किती वेळा मतदारसंघात आले ? कोणते प्रश्‍न सोडविले? त्यांनी काहीच काम केले नाही. मोठयाचं पोरगं आहे, पैसा भरपूर आहे, सत्तेची ताकद आहे म्हणून खासदार व्हायचंय ! यापेक्षा कोणतीही गुणवत्ता त्यांच्याकडे नाही ही वस्तूस्थिती असल्याचे सांगत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी खा. डॉ. … Read more

देशाला नीलेश लंकेंची गरज, त्यांना दिल्लीला पाठवा ! खा. सुप्रिया सुळे यांचे आवाहन

एक सुसंस्कृत, कष्ट करणारा, तुमच्या आमच्या बरोबर असणारा अतिशय प्रेमळ लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांना विधीमंडळात पाठविले. आता त्यांना दिल्लीला पाठवायचे असून देशाला नीलेश लंके यांची गरज असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथे आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये सुप्रिया सुळे बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार … Read more

Ahmednagar Crime News : वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : राहुरी रेल्वे स्टेशन येथे मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा करणारा टेम्पो महसूल पथकाने ताब्यात घेतला आहे.राहुरी रेल्वे स्टेशन येथील लोखंडी पुलाजवळ मुळा नदीच्या पात्रातून बेकायदा वाळूचा उपसा सुरू असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार दि. ९ मे रोजी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात महसूल विभागाचे पथक नदी पात्रात दाखल होताच … Read more

अखेर श्रीगोंदा बाजार समिती सचिव दिलीप डेबरे निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यावर बाजार समिती मध्ये आर्थिक अपहार, कामात अनियमितता या सारख्या विविध गोष्टींचा ठपका ठेवत अखेर त्यांचे निलंबित करण्यात आले. डेबरे यांच्या वरील निलंबन कारवाई ने सहकारात खळबळ उडाली आहे. ९ मे रोजी बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक बैठकीत सर्व संचालकांनी … Read more

संविधान वाचविण्यासाठी ११ हजारांची मदत ! बौध्दाचार्य संजय कांबळे यांनी आ. लंकेेंकडे केला धनादेश सुपूर्द आरपीआय आंबेडकर गटाचा लंकेंना पाठींबा

देशाचे संविधान वाचले पाहिजे अशी भूमिका घेत बैध्दाचार्य संजय कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांना ११ हजार रूपयांचा निवडणूक निधी दिला. दरम्यान आर पी आय आंबेडकर गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या आदेशान्वये या पक्षाचा निलेश लंके यांना पाठींबा जाहिर करण्यात आला आहे. शेखर पंचमुख यांनी सांगितले की, बहुजनांना अभिमान … Read more

अ‍ॅड कोल्हे यांची आ. लंके यांनी घेतली भेट पोलिसांनी गुुंडगिरीला चाप लावण्याची मागणी

न्यायालयाच्या आवारात करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अ‍ॅड. अशोक कोल्हे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार आ. नीलेश लंके यांनी नगर येथील रूग्णालयात जाऊन त्यांची भेट घेत विचारपूस केली. लंके यांनी अ‍ॅड. कोल्हे यांना धीर देत आम्ही सर्वजण तुमच्यासोबत असल्याची ग्वाही दिली. अ‍ॅड. कोल्हे यांच्याकडून घटनेचा तपशील जाणून घेतल्यानंतर वकीलांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी … Read more

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न

संविधान बदलण्‍याचा महाविकास आघाडीचा दावा म्‍हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न असून, कॉंग्रेस पक्षाकडून जाणीवपुर्वक खोडसाळपणाची वक्‍तव्‍य केली जात असल्‍याचा आरोप दलित महासंघ आणि बहुजन महासंघाचे संस्‍थापक अध्‍यक्ष प्रा.डॉ.मच्छिंद्र सक्‍टे यांनी केला. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍या प्रचारार्थ प्रा.मच्छिंद्र सक्‍टे यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची बैठक घेवून महायुतीच्‍या पाठीशी खंबीरपणे … Read more

ॲड अशोक कोल्हे यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे यांनी व्यक्त केला निषेध

न्यायालयाच्या आवारातच ॲड अशोक कोल्हे यांच्यावर अज्ञात इसमांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा खा. सुजय विखे पाटील यांनी जाहीर निषेध व्यक्त करत या प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपिंना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. ॲड अशोक कोल्हे यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना खा. डॉ. सुजय विखे आणि आमदार संग्राम जगताप यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या … Read more

पाथर्डी शहरात विजेचा लपंडाव; नागरिकांसह शेतकरी हैराण

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यात तापमान ४१ ते ४२ अंशापर्यंत पोचले आहे. सूर्य आग ओकत असल्याने तापमानाचा जेष्ठ नागरिकांसह लहान मुलांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच पाथर्डी शहरासह तालुक्यात मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे,. रात्री- अपरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांसह, ग्रामीण भागात भुरट्या चोऱ्यावाढल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. पाथर्डी व उपनगरातील … Read more

टोलनाक्यालाच शेतकऱ्याकडून आडवे दांडके…

Ahmednagar News

Ahmednagar News : नगरपाथर्डी मार्गे जात असलेल्या कल्याण -निर्मळ राष्ट्रीय महामार्ग ६१, या महामार्गाचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच या महामार्गावर मराठवाडी, ता. आष्टी, जि. बीड, या ठिकाणी वाहनांसाठी उभारण्यात आलेला टोलनाका वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. कारण ज्या ठिकाणी हा टोलनाका उभारण्यात आला आहे, त्या ठिकाणी एका शेतकऱ्याने हरकत घेतल्याने या टोलनाक्याजवळच पत्र्याचे … Read more

तीव्र पाणीटंचाईमुळे कहेटाकळीचे ग्रामस्थ त्रस्त ! जलजीवन पाणीपुरवठा योजनेचे काम पावसाळ्यापूर्वी करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : जायकवाडी प्रकल्पामध्ये पुनर्वसित झालेले तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीचे कहेटाकळी गावचे ग्रामस्थ तीव्र पाणी टंचाईमुळे त्रस्त झाले असून, गावाला चार-पाच दिवसातून एकदा व तोही अत्यंत कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत आहे. गावाच्या पायथ्याला अवघ्या एक किलोमीटर अंतरावर अथांग पसरलेला नाथ जलाशय, गावातून उघड्या डोळ्याने नाथसागराचे पाणी दिसतेय; परंतू ‘धरण उशाला आणि कोरड … Read more

मागणी वाढल्याने बाजारात बैलांचे भाव तेजित

Ahmednagar News

Ahmednagar News : अवघ्या एक महिन्यावर येवुन ठेपलेल्या आगामी खरीप हंगामासाठी शेती मशागतीला बैलांची गरज असल्याने शेतकऱ्यांकडून बैलांची मागणी वाढली असून, त्या प्रमाणात बाजारात बैल येत नसल्याने दुष्काळातही बैलबाजारात चांगलीच तेजी आली आहे. चाराटंचाई, पाणीटंचाई असली तरी बेलापुरी बैलापेक्षा शेती मशागतीला लागणाऱ्या जनावरांना मागणी वाढल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात बैलांच्या किमती … Read more

मानवतेची सेवा करणाऱ्या लंके यांना संसदेत पाठवा शरद पवार यांचे आवाहन श्रीगोंदे येथे पवार यांची जाहिर सभा संजय राऊत, बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती

कोरोना संकटात संपूर्ण जग भितीच्या छायेखाली असताना आपल्या जीवाची पर्वा न करता तीस हजारांहून अधिक कोरोना रूग्णांच्या माध्यमातून मानवतेची सेवा करणाऱ्या नीलेश लंके यांना संसदेत पाठवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदे येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत पवार हे बोलत … Read more

भाव गडगडल्याने कांदा उत्पादकांचा पारनेरात उद्रेक बाजार समितीतील लिलाव बंद पाडले पारनेर तहसील कार्यालयात धरणे आंदोलन

रविवारी मिळालेल्या भावाच्या तुलनेत कांद्याचे भाव प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी गडगडल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी बुधवारी पारनेर बाजार समितीतील कांद्याचे लिलाव बंद पाडले.यावेळी शेतकऱ्यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.मोदी हटाव, शेतकरी बचाव, शेतकरीविरोधी सरकारचा निषेध असो अश्या घोषणा यावेळी बाजार समितीच्या कार्यालयासमोर जमलेल्या शेतकऱ्यांनी दिल्या. यावेळी बाजार समितीचे उपसभापती बापूसाहेब शिर्के तेथे उपस्थित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याच्या शेतामध्ये महिलेचा मृतदेह आढळला

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : पाथर्डी तालुक्यातील भोसे – जोहारवाडी शिवारामध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळला. ही माहिती समजताच करंजी पोलीस आउट पोस्टचे पोलीस हवालदार कुसळकर घटनास्थळी पोहोचल्यानंतर या बेवारस मृतदेहाविषयी माहिती घेतली असता, ही महिला चिचोंडी, ता. पाथर्डी येथील असल्याचे समजले. भोसे गावाजवळ एका (६५) वर्षे वयाच्या महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती … Read more