Rice Farming : बातमी कामाची! धानाची वाढ होतं नाहीय का? मग ‘हे’ एक काम करा, फायदा होणारं

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rice Farming : भारतात वर्षानुवर्षे धान पिकाची (Rice Crop) शेती (Paddy Farming) केली जात आहे. या वर्षी देखील संपूर्ण भारतवर्षात धान पिकाची मोठ्या प्रमाणात रोवणी केली गेली आहे. आपल्या राज्यातील कोकणात प्रामुख्याने भात किंवा धान पिकाची शेती केली जाते.

मात्र यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे (Climate Change) अद्याप देखील मान्सूनचा (Monsoon 2022) कल स्पष्ट झालेला नाही. काही ठिकाणी पाऊस (Rain) अधिक झाला आहे तर काही ठिकाणी पावसाने अजूनही सरासरी ओलांडलेली नाही.

अशा परिस्थितीत धान पिकासमवेतच खरीप हंगामातील (Kharif Season) सर्व पिकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणारं असल्याचे भाकीत जाणकार वर्तवू लागले आहेत. जाणकार लोकांच्या मते पाऊस लांबल्याने संपूर्ण भारतवर्षातीळ धानाच्या उत्पादनात घट होण्याची अशांका आहे.

पावसाच्या लहरीपणाचा तसेच हवामान बदलाचा परिणाम म्हणून धानाच्या गुणवत्तेवर देखील परिणाम होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितलं जात आहे. एका अहवालानुसार, भातपिकामध्ये वाढ न होण्याचा रोग (Dwarfism in Paddy) आपल्या महाराष्ट्र समवेतच अनेक राज्यांमध्ये पसरत आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, या रोगामुळे भात रोपांची वाढ खुंटते आणि भात उत्पादन वेळेवर येत नाही. एवढेच नाही तर यामुळे उत्पादनावर तसेच भातपिकाच्या (Paddy Crop Management) गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो.

रोगाची प्रारंभिक लक्षणे तरी नेमकी कोणती बर..!

जाणकार लोकांकडून भात पिकातील वाढ न होण्याच्या रोगाची लक्षणे ओळखण्यासाठी शेताचे सतत निरीक्षण करण्याचा सल्ला दिला जातो. भात पिकाला जेव्हा हा रोग होतो तेव्हा धानाचे पीक पिवळसर होऊ लागते. असे सांगितल जाते की, अनेकदा तणांचा प्रादुर्भाव झाल्यास आणि पोषक तत्वांच्या कमतरता निर्माण झाल्यास ही समस्या उद्भवत असते.

तज्ञांचा सल्ला तरी नेमका काय आहे?

मित्रांनो एका रिपोर्टनुसार हवामानात झालेल्या विपरीत बदलामुळे संपूर्ण भारतवर्षातील विविध राज्यांमध्ये धान पिकाची वाढ थांबली आहे. धान पिकावर उद्भवलेल्या या समस्येसाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या शास्त्रज्ञांनी एक कृषी सल्ला देखील यावेळी जारी केला आहे. या कृषी सल्ल्याच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना काही सोपे उपाय सांगितले आहेत ज्याच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना (Farmer) भात पिकावर आलेल्या या समस्येचे निराकरण करता येणार आहे.

कृषी शास्त्रज्ञांनी जारी केलेल्या सल्ल्यानुसार, भात उत्पादक शेतकरी बांधवांनी भात पिकामध्ये सतत देखरेख ठेवून तण काढणे आणि निंदणी करणे सुरू ठेवले पाहिजे. यामुळे वातावरणात निर्माण झालेले ऑक्सिजन झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचू शकेल आणि तणांचे व्यवस्थापन करता येईल.

कृषी शास्त्रज्ञांनी नमूद केलेल्या सल्ल्यानुसार, शेतकरी बांधवांना भात पिकातून तण काढताना भातपिकात पिवळी धानाची रोपे दिसली तर उपटून टाकावीत. ही अशी झाडे आहेत जी संपूर्ण भात पिकामध्ये या रोगाचे संसर्ग वाढवत असतात.

याशिवाय भात पिकामध्ये 5 ते 20 टक्के पिवळी रोपे दिसत असल्यास ही संसर्ग झालेली रोपे काढून टाकावीत. संसर्ग झालेली रोपे कापल्यानंतर त्यांच्या जागी नवीन रोपे लावावीत.

धान पिकावर युरिया, डीएपी किंवा जीवामृतची फवारणी वेळेवर करावी, जेणेकरुन पिकामध्ये या रोगाची समस्या उद्भवणार नाही.

पिकामध्ये आवश्यकतेनुसार खतांचा वापर करा, म्हणजे भात पिकामध्ये जास्त खतांचा देखील वापर करू नये कारण जास्त खतांमुळे देखील भात पिकामध्ये विकृती देखील वाढते.

वाइट बैक्ड प्लांट हॉपर किटकाचा प्रतिबंध करावा 

हल्ली वाइट बैक्ड प्लांट हॉपर कीटकाचा धोका देखील भात पिकाच्या शेतात जाणवू लागला आहे. भात पिकात असलेल्या पाण्यात हे किडे व पतंग झाडांच्या मुळांजवळ तरंगत राहतात. त्यांच्या प्रतिबंधासाठी 235 मिली पॉक्सोलम 10 sc ची प्रति हेक्‍टरी पिकावर फवारणी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांकडून जारी करण्यात आला आहे.

शेतकर्‍यांना हवे असल्यास 200 ग्रॅम ओशन टूकन 20 एसजी किंवा चास 50 डब्ल्यूजी 300 ग्रॅम देखील प्रति हेक्‍टरी पिकावर फवारावे.

यावेळी भात रोपांची पाहणी करताना लक्षात ठेवा की झाडे झुकलेली असावीत. तसे नसल्यास भात पिकांमध्ये वाढ खुंटण्याची समस्या वाढू शकते.

धान पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कृषी मार्गदर्शक सूचनांचे पालन करत रहा आणि काही अडचण आल्यास कृषी तज्ज्ञांशी संपर्क साधा.