ब्रेकिंग ! आताची सर्वात मोठी बातमी ; राज्य कर्मचाऱ्यांच्या ‘या’ भत्त्यात झाली वाढ, महाराष्ट्रातील ‘या’ कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची पर्वणी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra state government employee : 2022 हे वर्ष महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी अतिशय कष्टाचे असे राहिले. गेल्यावर्षी सरकारने ओ पी एस अर्थात जुनी पेन्शन योजना राज्य कर्मचाऱ्यांना पुन्हा लागू होणार नाही असं स्पष्ट केलं.

सरकारच्या मते, राज्य कर्मचाऱ्यांना जर ओ पी एस लागू केली तर राज्यावर एक लाख दहा हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल यामुळे राज्य दिवाळखोरीत जाईल. अशा परिस्थितीत राज्य कर्मचाऱ्यांना ओपीएस बहाल करणे योग्य नाही. याशिवाय राज्य शासनाने गेल्या वर्षी केंद्र शासनाच्या धर्तीवर महागाई भत्ता वाढ देखील राज्य कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय केली नाही.

गेल्यावर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता अनुज्ञय झाला मात्र सद्यस्थितीला राज्य कर्मचाऱ्यांना केवळ 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. अशातच मात्र महाराष्ट्र राज्य शासनातील पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे.

पोलीस प्रशासनात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की महाराष्ट्र राज्यातील पोलीस उपनिरीक्षक ते अप्पर पोलीस अधीक्षक यांना पूर्वी 5000 रुपये प्रतिवर्षी गणवेश भत्ता मिळत होता.

आता शासनाने एक हजार रुपय यामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याने या अधिकाऱ्यांना आता एक हजार रुपये वार्षिक गणवेश भत्ता अनुज्ञय राहणार आहे. गृह विभागाकडून याबाबत एक सुधारित असा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे.

खरं पाहता पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार गणवेश भत्त्यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी केली जात होती. शेवटी गृह विभागाने याची दखल घेतली असून एक हजार रुपये गणवेश भत्त्यामध्ये वाढ अनुज्ञेय केली आहे. निश्चितच गणवेश भत्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांची असलेली ही मागणी अखेरकार निकाली निघाली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की याआधी पोलीस कर्मचाऱ्यांना गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचे साहित्य उपलब्ध करून दिले जात होते. मात्र आता पोलीस कर्मचारी, अधिकारी यांना गणवेश भत्ता दिला जातो