विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या हालचाली वाढल्या

मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे. शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द … Read more

मुर्मूंना पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा असे नाही; राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राऊतांचं वक्तव्य

मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रपती निवडणूक, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, एकनाथ शिंदे गट, ठाकरे गटांची एकमेकांवर टीका टिपण्णी अशा अनेक राजकीय घडामोडी सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व विषयांवर भाष्य केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला पाठिंबा दिला असे होते नाही, असे वक्तव्य संजय … Read more

“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय … Read more

“उद्धवसाहेबांना आता शरद पवार जवळचे झालेत अन् आम्ही दूरचे”

मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे. ‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

राजभवनाचा वापर करुन भाजप-शिंदे सरकार लादलं; संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. राज्यात भाजपसोबत हातमिळवणी करत शिदे गटाने सरकार स्थापन केले. यावरुन आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केला आहे. आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. सरकार बनवण्यासाठी विधीमंडळ आणि राजभवनाचा वापर केला. काही लोक म्हणत आहेत … Read more

तेव्हा लाज वाटली नाही; आदित्य ठाकरेंना गोगावलेंचे प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाकडून पक्षबांधणीसाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. शिवसेनेचा मेळावा घेण्यात आला भाषण करताना आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला. हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणूक पुन्हा लढा असे वक्तव्य आदित्य ठाकरेंनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याला आता शिंदे गटातील प्रतोद भरत गोगावले यांनी … Read more

ठाकरेंनी ‘वर्षा’ सोडला तेव्हा महिला रडत होत्या, त्या अश्रूंमध्ये गद्दार वाहून जातील- संजय राऊत

नाशिक : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. अनेक विषयांवरुन सेनेमध्ये अंतर्गत कलह सुरु आहे. बंडखोरांनी रोखठोक भाष्य करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. संजय राऊत आज नाशिकमध्ये सभेसाठी गेले असून सभेमध्ये बोलताना बंडखोर आमदारांवर राऊतांनी चांगलाच निशाणा साधला आहे. ‘शिवसेनेशी बेईमानी करणं सोपं … Read more

“शिवसेना आमच्याच बापाची, बंडखोरांना ५० खोके पचणार नाहीत”

नाशिक : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेतील वाद शिगेला पोहचला आहे. बंडखोरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संबंधित बंडखोर आमदार अद्याप आम्ही शिवसेनेत आहोत, असा दावा करत असले तरी शिवसेनत फूट पडल्याचे स्पष्टपणे दिसत आहेत. ४० आमदार एकनाथ शिंदे गटात गेल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य … Read more

“शिवसेनेचे हायकमांड ‘मातोश्री’वर, दिल्लीत नाही, ते भाजपचे मुख्यमंत्री”

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली आहे. एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. कोणी म्हणत असेल मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेचं सरकार आहे. तर ते चुकीचे आहे. शिवसेनेचे हायकमांड हे मुंबईमध्ये आहे. … Read more

गद्दार म्हणा, टींगल करा, आम्ही कामातून उत्तर देऊ; बच्चू कडूंचं वक्तव्य

मुंबई : राज्यात शिवसेना सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांना गद्दार म्हंटलं गेलं. यावरुन आता प्रहार संघटनेते प्रमुख बच्चू कडू यांनी उत्तर दिले आहे. ज्या लोकांनी मला निवडून दिले आहे, त्यांना न्याय देण्यासाठी लोकांनी मला … Read more

शिंदे मराठी माणसाच्या एकजूट फोडीचा नजराणा घेऊन गेलेत; दिल्ली दौऱ्यावरुन शिवसेनेची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार स्थापन झाले. शिवसेनेत मोठी फूट पडली यावरुन शिवसेनेमध्ये आता ठाकरे गट विरुद्ध शिंदे गटामध्ये आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी होत आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील या दोन्ही गटामध्ये वाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यावरुन शिवसेनेने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली … Read more

ते काही धुतल्या तांदळासारखे नाहीत; राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच राणेंची टीका

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटक वॉरंट जारी केले आहे. संजय राऊतांना अटक वॉरंट जारी केल्यावरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राऊतांवर टीका केली आहे.   संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांना अटक होणार. संजय राऊत … Read more

आधी आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग…; राऊतांचं ४० बंडखोरांना आव्हान

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली आणि सरकार स्थापन केले. तत्पुर्वी शिवसेनेतील ४० आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केला. त्यावरुन शिवसेनेमध्ये मोठा वाद झाला. राज्याच्या राजकारण मोठी उलथापालथ झाली. आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोरांना चांगलच धारेवर धरलं. त्याला संजय राऊतांनी टोला लगावला आहे. शिवसेना पक्षाशिवाय बंडखोर आमदारांचे अस्तित्वच … Read more

एकनाथ शिंदे ‘त्या’ दिवशी तासभर रडले; बंडखोर आमदाराने केला खुलासा

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदाराने एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेत अपमानास्पद वागणूक दिल्याचे सांगितले आहे. बंडखोरीचे कारण शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय गायकवाड यांनी सांगितले आहे. विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांना या निवडणुकांमधून बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून एकनाथ शिंदेंसोबत जो प्रकार सुरु होता, त्यामुळे त्यांचा संताप झाला … Read more

त्यांना आता ४० भोंगे मिळाले आहेत म्हणून…; राऊतांची भाजपवर टीका

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यामुळे शिवसेनेत मोठं खिंडार पडलं आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील बहुतांश शिवसैनिक हे शिंदे गटामध्ये जात आहेत. या पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत वक्तव्य केले आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरुन देखील मोठा वाद सुरु आहे. यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला काही धक्का बसलेला नाही. येथून गेलेले … Read more

धनुष्यबाण शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता; संजय राऊत म्हणतात, ‘जब खोने के लिए….’

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये मोठा वाद सुरु आहे. शिंदे गटाने दुसऱ्या कोणत्याही पक्षात न जाता शिवसेनेतच राहून भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सत्ता स्थापन केली. मात्र आता शिवसेनेमध्ये दोन गट पडल्याने शिवसेनेचे चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ठाकरे गटाच्या हातून जाण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना वेळ पडल्यास नव्या चिन्हावर लढायची … Read more