सगळीकडे वाढला मार्च एंडचा ‘फीवर’ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra News : आर्थिक वर्षाचा शेवटचा महिना म्हणून मार्च महिन्याला विशेष महत्त्व आहे. विविध व्यवसायांसाठी जुनी पुस्तके बंद व नवीन चालू मग ते आर्थिक असो वा इतर मात्र आता ग्रामीण भागातही मार्च एंड हा शब्द रुळला असून,

मार्च महिना आला, आमचे काम करा, म्हणत आर्थिक व्यवहार सुरळीत करताना नागरिक मार्च एंडचा आसरा घेत असल्याचे दिसून येत असून चहुबाजुंना मार्च एंडचा फिवर चढला असल्याचे चित्र आहे.

ग्रामीण असो की शहरी, शासकीय, सहकारी बँक, सरकारी बँक, अथवा खासगी पतसंस्था या संस्थांचे मार्च महिन्यात सर्व व्यवहार सुरळीत करून आर्थिक व्यवहाराचे गणित जुळवून घेत हिशोब पूर्ण केला जातो.

व्यापारी सर्वसामान्य नागरिक मार्च एन्डला विशेष महत्व देतात. त्यामुळे मार्च महिना सुरू होताच प्रत्येक जण आता आपली गुंतलेली उधारी प्रामुख्याने मागण्यास सुरुवात करत आहेत.

मार्च महिन्याचा आता शेवटचा आठवडा असल्याने, वसुलीसाठी मात्र अनेक व्यापारी वर्गासह नागरिकांनी मार्च एन्ड चा आसरा घेतला असून, गुंतलेले पैसे, उधारी मात्र काढण्यासाठी धावपळ चालू असलेली दिसत आहे.

एकंदरीत एरवी शहरी भागात वापरला जाणारा मार्च एंडचा आर्थिक वसुली साठीचा तगादा आता ग्रामीण भागातही पोहचला असून त्याचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. आला मार्च महिना आमचे काम करा म्हणत मार्च एन्डचा फिवर आहे.