मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू ; या ठिकाणी घडली दुर्दवी घटना

 

अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2021 :-  मायलेकांचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत तालुक्यातील डोंबाळवाडी येथे घडली आहे.याबाबत राजेश अभिमन्यू गलांडे यांनी या घटनेची कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील डोंबाळवाडी नजीकच्या मासाळ वस्ती येथील विश्वनाथ काशिनाथ मासाळ हे मेंढ्या चारीत असताना त्यांनी ओरडून मुलगा विहिरीत पडल्याचे सांगितले.

त्यावेळी विष्णू बाजीराव गलांडे व राजेश अभिमन्यू गलांडे यांनी विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळी त्यांना माऊली मंगेश गलांडे हा विहिरीतील पाण्यावर तरंगताना दिसला.

विहिरीत उडी मारून त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले त्याच्यावर बारामती येथे उपचार सुरू आहेत.घरी आल्यानंतर त्यांना त्याची आई वैशाली मंगेश गलांडे ( वय २६ वर्षे) व दुसरा मुलगा ओंकार मंगेश गलांडे (वय ३ वर्षे) हे घरी आढळून आले नाही.

त्यावेळी त्यांना हे विहिरीत पडले असावेत असा संशय आला. त्यामुळे त्यांनी विहिरीतील पाणी मोटारीचे सहाय्याने काढून पाण्याची पातळी कमी केली.

त्यांना विहिरीत ते दोघे आढळून आले. दोघेही बेशुद्धावस्थेत होते. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून कर्जतच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.