Ahmednagar Rain : मुसळधार पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- चार दिवसांच्या विश्रांतीनंतर नगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. नगर शहरात तासभर झालेल्या दमदार पावसाने रस्ते जलमय झाले आहे. हवामान खात्याने ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने कल्याण रोडवरील पुल … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्वाची बातमी ! …तर होणार वीजपुरवठा खंडित !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात महावितरणची विविध वर्गवारीतील एकूण ३ लाख १८ हजार ६८५ ग्राहकांकडे ४७७ कोटी ४६ लाख रुपये थकबाकी आहे. सध्या आर्थिक स्थिती गंभीर असल्याने थकबाकी वसुल करण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची मोहीम सध्या सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये वीज बिलांच्या थकबाकीमुळे अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-अहमदनगर: जिल्ह्यात आज ८८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १६ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८७५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रिक्षा चालकांच्या कल्याणकारी मंडळ व विविध प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक घेणार – अविनाश घुले

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्हा ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक संघटनेच्या सभासद नोंदणी करुन भिंगार विभागच्या रिक्षांवर संघटनेचे अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांच्या हस्ते स्टिकर लावण्यात आले यावेली संघटनेचे उपाध्यक्ष दत्ता वामन, भैरू कोतकर, सचिव अशोक औषिकर, सहसचिव लतीफ शेख, बाबा भाई, सोपान दळवी, अशोक खेतमाळस, सतिष गोंधळी, साईराज पिल्ले, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ही महिला झळकणार कोण होणार करोडपतीमध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यातील पिंपळनेर येथील माहेर वासीण असलेल्या व पारनेर न्यू आर्टस् कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज पारनेर महाविद्यालयात काम केलेले व सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे रामकृष्ण मोरे महाविद्यालय वनस्पतीशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक कल्पना सावंत या कोण होणार करोडपती या विशेष भागात दिसणार आहे. सोमवार दि.६ सप्टेंबर ते ८ … Read more

श्रद्धा नागरगोजे यांचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरव

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- येथील शिक्षिका श्रद्धा सुनील नागरगोजे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यात शिक्षण सहसंचालक दिनकर टेमकर व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नागरगोजे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, माध्यमिक शिक्षक … Read more

शेतात काम करीत असताना विषारी साप चावून विवाहितेचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- पुणतांबा चांगदेवनगर येथील कावेरी रविंद्र सांबारे (वय ३२) ही महिला स्वतःच्या शेतात काम करीत असताना विषारी साप चावून मृत झाल्याने तिचा संसारच उघड्यावर आला आहे. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कावेरी आपल्या शेतात गवत काढण्याचे काम करीत होती. कामाच्या नादात तिचे खाली लक्ष नव्हते. विषारी सापाने तिच्या पायाला दंश … Read more

अहमदनगर शहरातील खळबळजनक घटना : एकाच कुटुंबातील तिघांची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- कर्जाला कंटाळून पती-पत्नी सह मुलांनी आत्महत्या केल्याची घटना शहरातील केडगाव भागांमध्ये घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्यासह पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. या ठिकाणी एक चिट्ठी सुद्धा आढळून आलेली आहे. आत्महत्या केलेल्या मध्ये संदीप दिनकर फाटक … Read more

मी फरार नाही, जामीन घेणार नाही काँग्रेस कार्यकर्ते एसपी ऑफिसवर हल्लाही करणार नाहीत जिल्हाध्यक्ष काळेंचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- विनयभंग गुन्हा प्रकरणात मला अटक होईल म्हणून मी पळून गेलो आहे. फरार आहे. अशा प्रकारच्या वावड्या, अफवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काल पासून शहरात जाणीवपूर्वक उठवल्या जात आहेत. मी कुठेही पळून गेलेलो नाही. फरार नाही. मी इथेच नगर शहरामध्ये असून मी विनयभंगाचा माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्याच्या … Read more

जुन्या पथदिव्यांची जागी आता नवीन एलईडी दिवे झगमगणार

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- नगर शहरात स्मार्ट एलईडी पथदिवे बसविण्यासाठी ठेकेदाराला कार्यारंभ आदेश देऊन तातडीने पथदिवे बसविण्यास सुरुवात करावी. अशी मागणी नगरसेवक डॉ. सागर बोरुडे यांनी सभापती अविनाश घुले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान महापालिका स्थायी समितीने शहरातील स्मार्ट एलईडी प्रकल्पास मंजुरी दिली. पूर्वीचे जुने पारंपरिक पथदिवे बदलण्यात येणार असून, नवीन एलईडी … Read more

जिल्ह्यात आतापर्यंत ‘इतके’ टक्के पावसाची झाली नोंद

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :-नगर शहरात पावसाची संततधार कायम असून शनिवारी रात्रभर पाऊस बरसल्यानंतर रविवारी दिवसभर रिपरिप सुरू होती. दरम्यान, जिल्ह्यातील पावसाची सरासरीच्या 409 मि.मी. पावसाची नोंद झाली असून टक्केवारीत हा पाऊस 90 टक्के आहे. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्रभर संततधार पडत होता. रविवारी सकाळपासून विश्रांती घेतल्यावर दुपारी चारच्या सुमारास पुन्हा … Read more

चार दिवसांत १० शेतकऱ्यांची पंधरा जनावरे दगावली

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसात मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. जिल्ह्यातील अनेक भागात ढगफुटी जन्य पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले होते. यातच केलवड मध्ये चार दिवसांत १० शेतकऱ्यांची जनावरे मृत्युमुखी पडली. नानासाहेब राऊत यांच्या ३, संदीप गमे यांची १, किशोर गमे यांच्या २, मच्छिंद्र गमे यांची … Read more

गुरुमाऊली मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे

अहमदनगर Live24 टीम, 6 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा गुरु माऊली प्राथमिक शिक्षक मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी राजकुमार साळवे यांची तर जिल्हा कार्यकारी अध्यक्षपदी बाळासाहेब सरोदे तर कार्याध्यक्षपदी अजय लगड यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, शिक्षक बँकेचे चेअरमन … Read more

चोरटे बिनधास्त… पोलीस निर्धास्त… नागरिक जगतायत दहशतीखाली

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढले मात्र गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे. यामुळे सध्या नागरिकांची सुरक्षा हि बेभरवशी आहे, असेच चित्र सध्या नगर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. नुकतेच नगर शहरातील कल्याण रोड परिसरात … Read more

जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सकारात्मक

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-जिल्ह्यात उद्योग व्यवसाय वाढीसाठी पूरक सोयीसुविधा उपलब्ध करणे तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसीच्या प्रलंबित प्रश्नांबाबत उद्योगमंत्री सुभाष देसाई सकारात्मक आहे. दरम्यान लवकरच ही बैठक मुंबईत घेणार असल्याचे उद्योगमंत्री यांनी सांगितले आहे. जिल्ह्यातील एमआयडीसी मधील उद्योजकांच्या विविध प्रश्नांबाबत नगरच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाची उद्योगमंत्री ना. सुभाष देसाई यांची जलसंधारण मंत्री ना. शंकरराव गडाख … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ७५० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख १५ हजार १५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.२६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७२३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

रेकॉर्डब्रेक ! जिल्ह्यात एकाच दिवसात एवढ्या नागरिकांना कोरोना लसीचा डोस

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक कार्यक्रमात महाराष्ट्रानं विक्रमी कामगिरी केली आहे. यातच जिल्ह्यात देखील शनिवारी लसीकरणाबाबत एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. जिल्हा परिषदे प्राथमिक आरोग्य, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिकेच्या आरोग्य केंद्रातून शनिवारी पहिल्यांदा 62 … Read more

मोबाईलवरुन तलाक..तलाक..तलाक.. मेसेज करत विवाहितेला घराबाहेर काढले

अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-  माहेरुन 10 लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या लोकांनी छळ करुन एका विवाहितेच्या पतीने मोबाईलवरुन तलाक..तलाक..तलाक.. असा मेसेज पाठवून बेकायदेशीर तलाक देत विवाहितेला घरातून बाहेर काढून दिले. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात पती, सासू, सासरा, दीर व सासूच्या आईसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी … Read more