Business Ideas : गुंतवणूक कमी फायदा जास्त! फक्त 20 हजार रुपयांमध्ये सुरु करा हा छोटा व्यवसाय आणि दरमहा कमवा 50 हजार रुपये…

Rushikesh Ahmednagarlive24
Published:

 

Business Ideas : आजकाल अनेकजण नोकरी सोडून व्यवसायाकडे वळत आहेत तर अनेकांची नोकरी गेल्याने किंवा नोकरी मिळत नसल्याने व्यवसायाच्या शोधात आहेत. जर तुम्हीही व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आज एका कमी गुंतवून जास्त फायदा असणाऱ्या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत.

अनेकांना व्यवसाय करायचा असतो मात्र बजेट कमी असल्याने व्यवसाय करणे शकत होत नाही. मात्र कमी गुंतवणूक करूनही असे काही व्यवसाय सुरु करता येऊ शकतात ज्यातून तुम्हाला चांगला नफा देखील मिळेल.

भांडवलाच्या कमतरतेमुळे अनेकजण वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असतात. तसेच रोज १२ ते १४ तास काम करूनही पगार चांगला मिळत नाही. मात्र २० हजारांच्या गुंतवणुकीत तुम्ही चांगला व्यवसाय करू शकता.

खेळण्यांचा व्यवसाय

हा व्यवसाय तुम्ही २० हजार रुपये खर्चूनही करू शकता. आपल्या देशात पूर्वीपासूनच खेळणी आयात केली जातात. चीनमधून मोठ्या प्रमाणात खेळणी आयात केली जातात. मात्र जर तुम्ही हा व्यवसाय सुरु केला तर हजारो रुपयांमध्ये तुम्ही नफा कमवू शकता.

भारत सरकार स्वावलंबी भारत आणि मेक इन इंडिया सारख्या नवीन योजनांवर काम करत आहे. जर तुम्ही खेळण्यांचा व्यवसाय सुरु केला तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो आणि तुम्हाला व्यवसाय वाढवायला आर्थिक मदत होऊ शकते.

वेस्ट मटेरियल रिसायकल

हा अशाच कमी भांडवलाचा व्यवसाय आहे. म्हणजे टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करण्याचा व्यवसाय. 10 ते 20 हजार रुपयांमध्ये हा व्यवसाय कोणत्याही स्तरावर सुरू करता येईल. या व्यवसायात तुम्ही दर महिन्याला मोठी कमाई करू शकता.

त्यासाठी महापालिकेसारख्या सरकारी विभागांशीही संपर्क साधता येईल. कारण या विभागांमधून मोठ्या प्रमाणात कचरा बाहेर पडतो. या टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर करून तुम्ही अनेक उपयुक्त साहित्य तयार करून बाजारात विकू शकता. हे व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देखील मिळवू शकता.