PPF Scheme : पीपीएफ गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! पैसे गुंतवण्यापूर्वी जाणून घ्या नाहीतर…

Pragati
Published:

 

PPF Scheme : सध्या अशा योजना आहेत ज्यात तुम्ही गुंतवणूक करू शकता. परंतु, गुंतवणूकदार जास्त व्याजदर आणि कोणतीही जोखीम नसणारी योजना निवडतात. यापैकीच एक योजना म्हणजे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना होय, देशभरातील लाखो लोक सरकारच्या योजनेत गुंतवणुक करत आहेत.

भारतातील कोणताही नागरिक यात गुंतवणूक करू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांना यात दीर्घकाळ गुंतवणुक करता येते. अशातच आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये पैसे गुंतवणार्‍यांसाठी मोठे अपडेट समोर आले आहे. जाणून घेऊयात सविस्तर.

किती आहे पीपीएफ योजनेचे व्याज

कोणत्याही भारतीय नागरिकाला PPF योजनेत 500 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. हे लक्षात ठेवा की या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते. परंतु, सध्या या योजनेत आर्थिक वर्ष 2022-23 च्या चौथ्या तिमाहीसाठी वार्षिक 7.1 टक्के व्याज देण्यात येत आहे.

किती आहे परिपक्वता वेळ?

परंतु, या योजनेत पैसे गुंतवत असाल तर हे लक्षात ठेवावे की या योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे 15 वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येतात. या दरम्यान काही रक्कम नक्कीच काढता येते, तरीही या योजनेत मॅच्युरिटी 15 वर्षांनीच होते. त्यामुळे जर एखाद्याला या योजनेत गुंतवणूक करायची असल्यास 15 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीची माहिती असावी.

कर सवलत किती मिळते?

दीर्घकाळ गुंतवणूक करायची असेल तर ही योजना अशा गुंतवणूकदारांसाठी सुरु केली आहे. त्यामुळे जेव्हाही तुम्ही या योजनेत पैसे गुंतवता तेव्हा तुम्हीच ठरवा की तुम्ही 15 वर्षांसाठी गुंतवणूक करण्यास तयार आहात की नाही? इतकेच नाही तर या पीपीएफ योजनेत आता गुंतवणुकीसाठी कर लाभही उपलब्ध आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत या योजनेतून कर सवलत मिळू शकते.