“राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पे रोलवर काम करतात”; चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांना डिवचले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोल्हापूर : भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना पुन्हा एकदा डिवचल्याचे दिसत आहे. त्यांनी संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करत निशाणा साधला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले, संजय राऊत हे उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) कमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त आहेत. राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पे रोलवर काम करत आहेत अशा खरपूस शब्दात त्यांनी राऊतांचा समाचार घेतला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुणे मेट्रो (Pune Metro) वरूनही ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, पुणे मेट्रोच्या उदघाटनावेळी आम्ही असं केलं का? या सरकारचं मन मोठं नाही.

त्यांना केवळ मोदी नावाची अॅलर्जी आहे. फडणवीसांना कार्यक्रमाला बोलावलं असतं तर चाललं असतं असेही पाटील म्हणाले आहेत.

गृहमंत्रीपदावरूनही (Home Minister) पाटील यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला चिमटे काढले आहेत. गृहमंत्री म्हणून वळसे-पाटील लेचेपेचे आहेत. व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. पवार कुटुंबातूनही वळसे-पाटलांचं नाव समोर आणलं.

उद्धव ठाकरे यांना सल्ला देण्याची वेळ निघून गेलीय. मी सांगितलं होतं की गृहमंत्रीपद तुम्ही राष्ट्रवादीकडे देऊ नका. मी बोललो होतो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मातोश्रीलाही कॅमेरे लावतील. पण त्यावेळी माझ्या बोलण्यावर हसले होते असेही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर पोटनिवडणुकीबाबतही भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी सतेज पाटलांना देखील टोला लगावला आहे. ते म्हणाले कोल्हापूर उत्तरमध्ये भाजप एक हाती बाजी मारेल, असा दावा पाटील यांनी केलाय.

माझी एखादी क्लिप मोडून तोडून व्हायरल केली जातेय. धनंडय महाडिक यांनी महिलांचा अपमान केला असा व्हिडीओ व्हायरल केला जातोय. या सगळ्याबाबत आम्ही सायबर सेलकडे तक्रार करणार आहोत.

कोल्हापुरात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माहिती भरुन घेतली जातेय. PayTM वरुन पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न कोल्हापुरातूनही सुरु केलाय. भाजपने कधीही प्रचाराची पातळी सोडली नाही. जाणीव नसलेल्या नेत्यांची यादी मोठी आहे. त्यात सतेज पाटील टॉपला आहेत असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.