मोठी बातमी ! मंत्री नवाब मलिकांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

 

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2022 Maharashtra News :- राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या प्रकरणी आज कोर्टात पुन्हा सुनावणी झाली.

मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती आणि ती आज संपली असून सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

यामुळे मलिक यांना दिलासा मिळालेला नाही आहे. दाऊद इब्राहिमशी संबधित मनी लॉन्डिरग प्रकरणात नवाब मलिक यांना दीर्घ चौकशीनंतर अटक करण्यात आली होती.

त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडीत पाठवले होते. ही कोठडी संपल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले.

त्यानंतर न्यायालयाने मलिक यांना ७ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली होती आणि त्याच दिवशी त्यांना आठ दिवसांच्या कोठडीत पाठवण्यात आले होते.

सकाळी ६ वाजता केंद्रीय तपास यंत्रणेचे अधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मलिक यांच्या घरी पोहोचले, जिथे त्यांची तासभर चौकशी करण्यात आली. यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांची प्रदीर्घ चौकशी झाली.

चौकशीनंतर मलिक यांना अटक करण्यात आली. आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्याने २१ मार्चपर्यंत जेलमध्ये राहावे लागणार आहे.