मराठमोळ्या शेतकऱ्याचा कौतुकास्पद प्रयोग ! ‘या’ पद्धतीने कांदा, सोयाबीन लागवड करून उत्पादनात केली वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Farmer Success Story : राज्यातील शेतकरी बांधवांना निसर्गाच्या लहरीपणामुळे कायमच नुकसान सहन करावे लागते. यावर्षी देखील खरीप हंगामात निसर्गाचा लंगरीपणाचा चव्हाट्यावर होता. सुरुवातीला अतिवृष्टी आणि शेवटी शेवटी परतीचा पाऊस यामुळे बळीराजा अक्षरशः मेटाकुटीला आला होता.

यामधून कसाबसा सावरत बळीराजा आता रब्बी हंगामाकडे वळला आहे. मात्र असे असले तरी या अशा विपरीत परिस्थिती मधूनही आपल्या राज्यातील अनेक प्रयोगशील शेतकरी बांधव विक्रमी असं उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधत असतात.

आज आपण महाराष्ट्राच्या या मातीतील अशाच एका प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने विपरीत परिस्थितीचा सामना करत सोयाबीन आणि कांदा या दोन्ही नगदी पिकातून दर्जेदार असे उत्पादन घेऊन सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला आहे.

जिल्हा तालुका जालनामधील मौजे शिवनी येथील प्रयोगशील शेतकरी उद्धव खेडेकर यांनी बदलत्या काळानुसार शेतीमध्ये मोठा बदल करत वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पादनं घेण्याची किमया साधली आहे. विशेषता त्यांनी कांदा आणि सोयाबीन पिकाच्या उत्पादन पद्धतीत मोठा बदल केला आहे आणि याचा त्यांना फायदा होत असून त्यांनी स्वीकारलेल्या या पॅटर्नची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे.

हेच कारण आहे की शेती मधल्या या ध्येयवेड्या शेतकऱ्याला राज्य शासनाचा आणि केंद्र शासनाचा पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. खेडेकर आपल्या शेतात प्रामुख्याने कांदा आणि सोयाबीनची लागवड करत असतात. कांदा हे त्यांच्या शेतात उत्पादित होणारं एक मुख्य नगदी पीक असून त्यांनी एकरी 250 क्विंटल पर्यंतचे उत्पादन घेऊन दाखवला आहे.

यासाठी कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, कृषी विद्यापीठ व कृषी विभागाचे त्यांना अनमोल असं मार्गदर्शन देखील लाभले आहे. कांदा पिकासाठी त्यांनी पारंपारिक पद्धतीचा अवलंब न करता वाफा पद्धतीने कांदा लागवड केली आणि कांद्याला सिंचन करण्यासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केला.

तसेच कांदा लागवड करताना चांगल्या दर्जेदार रोपांची निवड करणे, लागवडीनंतर पीक संरक्षणाच्या योग्य त्या उपाययोजना करणे, पाण्याचा योग्य वापर, खतांचा योग्य वापर करून कमी उत्पादन खर्चात त्यांनी एकरी 250 क्विंटल पर्यंतचे उत्पादन 2017 मध्ये घेऊन दाखवल आहे. तसेच सोयाबीन बाबत जर बोलायचं झालं तर त्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाने याची लागवड केली.

अशा पद्धतीने लागवड केल्यामुळे त्यांना एकरी 12 ते 15 क्विंटल चा उतारा मिळाला. याशिवाय त्यांनी खरबूज पिकाची देखील लागवड केली आहे. या पिकाची लागवड त्यांनी शेडनेट हाऊस मध्ये केली असून अल्पकालावधीत काढणीसाठी तयार होणारे हे खरबूज पीक त्यांच्यासाठी फायद्याचे ठरले. खरबूज पिकांची शेडनेटमध्ये लागवड केली आणि त्याच्या वेलीसाठी तारांचा वापर करण्यात आला.

विशेष म्हणजे या पद्धतीने लागवड केल्यामुळे दीड ते दोन किलोचे फळ त्यांना मिळाले आणि या फळाची योग्य पद्धतीने प्रतवारी करून त्यांनी विदेशात याची विक्री केली. निश्चितच काळाच्या ओघात जर शेती मध्ये बदल केला आणि तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेतले तर शेतीतून चांगली कमाई शेतकऱ्यांना करता येणे सहज शक्य आहे.