शिंदे-ठाकरे एकत्र यावे म्हणून दीपाली सय्यद मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई : गुरुपौर्णिमेनिमित्त आज शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी अग्रदूत बंगल्यावर गेल्या आहेत. यावेळी त्यांनी शिंदे आणि ठाकरे गटांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यासाठीच शिंदे साहेबांना भेटणार असल्याचं दिपाली सय्यद यांनी सांगितलं आहे. एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेही जाणार आहेत. मग … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये अन्यथा..; राऊत राज्यपालांवर आक्रमक

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या … Read more

‘त्यांच्या’ पत्राने १०० हत्ताचं बळ मिळालं; ठाकरे गटातील आमदाराचे वक्तव्य

मुंबई : शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर शिवसेनेशी एकनिष्ठ राहिलेल्या आमदारांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्र पाठवून आमदारांचे आभार मानले आणि कौतुकही केले. उध्दव ठाकरे यांनी पत्राच्या माध्यमातून दिलेल्या कौतुकाच्या थापेमुळे आपणास शंभर हत्तीचं बळ मिळाले आहे, अशी भावना शिवसेना आमदार डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतंर्गत आमदारांनी एकापाठोपाठ … Read more

“अशा आमदारांना राज्यपाल शपथ देणार असतील तर डॉ. आंबेडकरांची घटना उद्धवस्त झाली…”

मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात … Read more

भाजपसोबत युती करण्याची सेना खासदारांची मागणी; उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अखेरीस एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांनी अधिक माहिती दिली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकत्र असेल तर विकास कामांना गती मिळेल. नैसर्गिक युती करावी अशी मागणी शिवसेनेच्या खासदारांनी पक्ष प्रमुखांना बैठकीत केली. भाजपसोबत युतीमध्ये असताना आलेले … Read more

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या हालचाली वाढल्या

मुंबई : राज्यात शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटाला सत्तेपासून दूर व्हावे लागले आहे. राज्यातील सत्ता गमावल्यानंतर आता विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी शिवसेनेने हालचालींना सुरुवात केली आहे. सभापती रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपुष्टात आला होता. त्यामुळे आता विधान परिषदेत नवा विरोधी पक्षनेता नेमला जाणार आहे. शिवसेना आमदारांकडून उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे पत्र सुपूर्द … Read more

“जो पक्षाचा अन् पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत संजय राऊत”

मुंबई : राज्यात शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपचे सरकार आल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी पक्षाच्या सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. ‘जो पक्षाचा आणि पक्षप्रमुखांचा निर्णय असतो, त्याच्यासोबत मी असतो. संजय राऊत नाराज असल्याच्या बातम्यांमध्ये तथ्य नाही’, असा दावा शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले आहेत. शिवसेनेने यापूर्वी अनेकदा राजकारणापलिकडे जाऊन निर्णय … Read more

“उद्धवसाहेबांना आता शरद पवार जवळचे झालेत अन् आम्ही दूरचे”

मुंबई : शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडल्याने अवघ्या महाराष्ट्रात या विषयी अनेक चर्चा रंगल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आज दिलेल्या निर्देशानंतर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेच्या बंडखोर गटाने मुंबईत पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बोलताना एक खंत बोलून दाखवली आहे. ‘कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. … Read more

धनुष्यबाण नेमका कोणाचा? सेनेच्या ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे धाव

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धुनष्यबाण यावरुन आता शिवसेनेच्या दोन गटांमध्ये कलगितुरा रंगला आहे. दोन्ही गटाकडून धनुष्यबाणावर आपला हक्क बजावला जात आहे.शिवसेनेच्या हातून धनुष्यबाण जाण्याची चिन्ह दिसत असतानाच आता शिवसेनेने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत एक याचिका दाखल केले आहे. शिवसेनेने केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी ‘आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ … Read more

“न्यायालयाचा निर्णय योग्यच, सेनेच्या याचिकेला आता काही अर्थ नाही”

मुंबई : बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकेवर विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश आज सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे शिंदे गटातील १६ आमदारांना आता दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावर आता एकनाथ शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकर यांनी भाष्य केले आहे. ‘सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वांनाच आता दिलासा दिला आहे. न्यायालयाची भूमिका योग्य आहे. शिवसेनेने … Read more

आधी ठाकरेंकडे या म्हणत रडणारे संतोष बांगर आता उद्धव ठाकरेंनाच म्हणाले, ‘दृष्टीकोन बदला’

मुंबई : शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय बांगर यांना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर संजय बांगर आक्रमक झाले आहेत. बांगर यांच्या समर्थनार्थ मुंबईत शक्तीप्रदर्शन करणार आहेत. मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना माझी शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवड झाली होती. मी कोणतीही चूक केलेली नाही. मी प्रसारमाध्यमांमध्ये मला पदावरुन हटवण्यात आल्याचे वृत्त … Read more

शिवसेनेचे निवडणूक चिन्हाबाबत धनुष्यबाणाबाबत अनिल परबांचे मोठे वक्तव्य

मुंबई :  राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटाचे आणि भाजपचे सरकार स्थापन झाले. त्यावरुन शिवसेनेतील अंतर्गत वाद आता न्यायालयामध्ये पोहचला आहे. सध्या शिवसेनेत निवडणूक चिन्हाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले असताना शिवसेना नेते अ‌ॅड. अनिल परब यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईबाबत दिलेल्या निर्देशानंतर अनिल परब यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निवडणूक … Read more

औरंगाबादच्या नामांतराला पवारांचा विरोध? संजय राऊत म्हणाले…

मुंबई : शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजप सत्तेत येण्यापूर्वीच्या ठाकरे सरकारने औरंगाबद शहराचे नामांतर करुन संभाजीनगर असे केले. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत काही माहिती किंवा चर्चा झाली नसल्याचे म्हंटले. याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारले असता संजय राऊतांनी या प्रश्नाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. शरद पवारांनी एवढंच म्हटले आहे की … Read more

बंडखोरांविरोधात शिवसेनेची कठोर कारवाई; संतोष बांगर, तानाजी सावतांना पहिला फटका

मुंबई : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा त्याग करावा लागला. आमदारांच्या या बंडखोरीनंतर शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट पडले आहेत. ठाकरेंकडून बंडखोर आमदारांना यापूर्वी अनेकवेळा परतण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र आमदार परत न आल्यामुळे आता शिवसेनेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचे … Read more