अहमदनगर शहरात भाजप नगरसेवक गुंडांकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची हत्या ! हल्ला करून म्हणतो संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका…

Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ … Read more

तिथे फलप्राप्ती झाल्याशिवाय ते गप्प बसतील असे वाटत नाही; मंत्रिमंडळाबाबत जयंत पाटलांचं भाकित

मुंबई : गुवाहाटीतील वस्तीचे दिवस आणि आतापर्यंतचे दिवस पाहिले तर दोन महिने झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त आहेत. दुसरीकडे राज्याला अपंग करुन सोडलंय, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्याअर्थी मंत्रिमंडळाचा विस्तार करत … Read more

सरकारमध्ये आलाय आता राज्याच्या समस्या तरी सोडवा; अजितदादांचा भाजपला खोचक टोला

मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन झाले. पण अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही. असे असले तरी शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीकडून घोषित केलेल्या अनेक योजनांचा निधी रोखला आहे किंवा स्थगिती दिली आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more

‘याच वृत्तीमुळे पवारसाहेब बदनाम’ बाबासाहेब पुरंदरेंचं कौतुक केलेलं पत्र निलेश राणेंनी केले शेअर

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. ‘धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही’, असे मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. यानंतर शरद पवारांवर टीका होत असून त्यांचे एक जुने पत्र समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. … Read more

देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री??? अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणतात….

पुणे : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. त्यावर आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निष्ठावंत मानले जाणारे राष्ट्रवादीचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुणे जिल्हा हा पवारांचा बालेकिल्ला आहे. हे महाराष्ट्रासह देशाला माहित आहे. पुण्यासह महाराष्ट्रासाठी पवार यांचे योगदान कोणीही कदापी विसरू शकणार … Read more

राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त; राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव प्रफुल्ल पटेल यांनी संबंधित प्रमुखांना पत्र पाठवले असून ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. यासोबत त्यांनी ट्विट करत अधिकृतपणे निर्णयाची माहिती दिली आहे. अध्यक्ष शरद पवारांच्या संमतीने … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

भाजपला दूर ठेवण्यासाठी आगामी निवडणूक एकत्र लढणार; शरद पवारांची घोषणा

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी सेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडी सरकार कोसळले. नवे सरकार स्थापन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज कार्यकारणी बैठक घेतली. या बैठकीमध्ये शिवसेनेसोबतच आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘भाजपला दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एकत्र लढणार’ … Read more

जिथं आपली ताकद जास्त तिथं कोणाचीही मदत न घेता जागा लढवायची- अजित पवार

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात आढावा बैठक पार पाडली. या बैठकीमध्ये विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. ‘आज अनेक पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भाषणे केली. पण आपापल्या भागात राष्ट्रवादी काँग्रेसची जागा निवडून येण्याची खबरदारी सर्वांनी घ्यावी’, असे आवाहन अजित पवारांनी केले. ‘राज्यात कोणत्याही निवडणुका जाहीर झाल्या तर त्या लढविण्याची … Read more

…म्हणून मी मुख्यमंत्र्यांना भेटलो; जितेंद्र आव्हाडांनी केला भेटीचा खुलासा

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अद्यापही शिवसेनेचे आमदार, खासदार संपर्कात असल्याचे बोलले जात आहे.   राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने राज्याच्या राजकारणामध्ये अनेक चर्चांना उधाण … Read more

जितेंद्र आव्हाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई :  शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत मोठी फूट पाडून भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेमध्ये शिंदे आणि ठाकरे गट पडले आहेत. सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेतील आमदार, खासदार अजूनही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहोचले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका; ओबीसी समाजाबाबत राष्ट्रवादीचा मोठा निर्णय

मुंबई :  राज्यात ओबीसी राजकीय आरक्षणाचा निर्णय रखडून आहे. त्यातच आता असताना काही ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयाला सर्वपक्षीयांचा विरोध होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या … Read more

शरद पवारांशी कोणतीही भेट झाली नाही; एकनाथ शिंदेंनी दिले स्पष्टीकरण

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो जुना असून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. माझी आणि शरद पवारांची नुकतीच कोणतीही भेट झालेली नाही. प्रसार माध्यमांमध्ये व्हायरल झालेला फोटो जुन्या भेटीचे आहेत, असेही स्पष्टीकरण … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यात शिंदे सरकार स्थापन होण्यापूर्वी शिवसेनेवर नाराज असलेल्या आमदारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिला होता. अनेक बंडखोर आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबाबत अनेक तक्रारी देखील केल्या. अनेक नाट्यमय घडामोडींनंतर राज्यात भाजपसोबत युती करत शिंदे सरकार स्थापन झाले. राज्यात विशेष अधिवेशन सुरु असताना सभागृहामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी … Read more

आम्ही निवडून येण्याची चिंता अजितदादांनी करु नये; गुलाबराव पाटलांचा खोचक सल्ला

मुंबई : राज्यातील विशेष अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशना दरम्यान सभागृहामध्ये पहिल्या दिवशी सत्ताधारी विरोधकांमध्ये तुफान खडाजंगी पहायला मिळाली. आजच्या दुसऱ्या दिवशी देखील सत्ताधारी आणि विरोधपक्ष नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पहायाला मिळत आहे. सभागृहामध्ये शिंदे गटातील शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. ‘जे शिवेसना सोडून गेलेत त्यांना कोणी पुन्हा … Read more