Ahmednagar News : भाजपच्या दक्षिणेतील वर्षानुवर्षांच्या सत्तेला लंके यांनी लावला सुरुंग

Ahmednagar News : अहमदनगर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत महाविकास आघाडीचे निलेश लंके यांनी बाजी मारली तर महायुतीचे विद्यमान खासदार सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जावे लागले, लंके यांनी २८ हजार ९२९ मतांच्या फरकाने सुजय विखे यांचा पराभव केला. लंके यांचा विजय घोषित झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण जल्लोष साजरा केला. … Read more

Ahmednagar News : लंके यांच्या विजयाचा राहुरीत जल्लोष : आमदार प्राजक्त तनपुरे यांचे प्रयत्न सफल

Ahmednagar News : डॉ.सुजय विखे पाटील यांच्या विरोधात निलेश लंके यांनी बाजी मारत विजय मिळवला. न भूतो न भविष्यती असा निकाल लागला असून यामध्ये लंके सुमारे ३० हजार मतांनी विजयी झाले आहेत. या विजयाचा राहुरी तालुक्यात महाविकास आघाडीच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. अहमदनगर दक्षिणच्या लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया ही १३ मे रोजी संपन्न झाली … Read more

Ahmednagar News : द्वेषाचे राजकारण करणारे सरकार जनतेला मान्य नाही; आमदार बाळासाहेब थोरात

Ahmednagar News : Ahmednagar News : भारतीय जनता पक्षाकडून देश पातळीवर होत असलेले द्वेष भावनेचे राजकारण आणि राज्यांमध्ये चुकीचा पायंडा पाडून आलेले सरकार हे जनतेला मान्य झाले नाही. याविरुद्ध मतदारांनी कौल देऊन भाजपची मस्ती जिरवली आहे. अशी टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणूकीमध्ये आघाडीच्या उमेदवारांनी राज्यात उत्कृष्ट यश … Read more

आ. राम शिंदे यांची नाराजी ! कर्जत-जामखेड मतदारसंघातुन विखेंच्या पराभवाची सुरवात…

डॉ. सुजय विखे यांचे कर्जत-जामखेड मतदारसंघाकडे झालेले दुर्लक्ष, तसेच आ. राम शिंदे यांची नाराजीही विखे यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्याचे दिसते. विखे यांनी राम शिंदे यांची नाराजी अखेरच्या टण्यात दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही त्यांना मतदारसंघात पुरेसे मतदान मिळू शकले नाही. २०१९ च्या निवडणुकीत जामखेडमधून विखेंना १८,५०० एवढे लिड मिळाले होते. मतदारसंघातील जनतेला सापत्न वागणूक … Read more

Ahmednagar Politics : एका निकालाने भाजप सह विखेंच्या बालेकिल्ल्याला सुरूंग ! आजोबांनंतर नातवाचा झाला पराभव…

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अखेर नीलेश लंके यांनी बाजी मारली. सकाळपासून आघाडीवर असलेले सुजय विखे दुपारनंतर मागे पडल्याने नीलेश लंकेंच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयश्री साजरी केली. ही लोकसभा निवडणूक अनेक अर्थांनी वेगळी ठरली आहे, या निवडणूक राज्यभरात भाजपसह मित्रपक्षांची मोठी पिछेहाट झाली. त्यात लक्षवेधी लढत ठरलेल्या अहमदनगर लोकसभेकडे राज्याचे लक्ष लागले होते. नगर जिल्ह्याचा … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ह्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार !

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात २५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये २३ उमेदवारांचे डिपॉझिट जस होणार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार वैध मतांपेक्षा कोणत्याही उमेदवाराला १६.६६ टक्के मते मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे अहमदनगर मतदारसंघात डिपॉझिट वाचवण्यासाठी २,२०,०५३ मतांची आवश्यकता होती. यानुसार उमाशंकर यादव, आरती हालदार, कलीराम बहिरु, डॉ. फैलाश जाधय, रवींद्र कोठारी, दत्तात्रय वाघमोडे, दिलीप खेडकर, भागवत गायकवाड, … Read more

निलेश लंके यांच्या विजयामुळे जनशक्तीचा विजय ! विखे फॅक्टरचा फुगा फुटला

जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके व भाऊसाहेब वाकचौरे लोकसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्यांनी निवडून आले. या निवडणुकीतून जनशक्तीचा विजय झाला असून, विखे फॅक्टरचा फुगा फुटल्याची भावना कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. अॅड सुभाष लांडे यांनी व्यक्त केली. दोन्ही नवनिर्वाचित खासदारांचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने त्यांनी अभिनंदन केले. कम्युनिस्ट पक्षाने महाविकास आघाडीला राज्यभर सक्रिय पाठिंबा दिला … Read more

निलेश लंके यांनी ह्या ४ तालुक्यात मिळविली आघाडी ! भाजप नेत्यांच्या मतदारसंघात लंकेची ‘हवा’

lanke

नगर दक्षिणमध्ये अटीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी अखेर बाजी मारली आहे. भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि माजी आमदार नीलेश लंके यांच्यातील ही लढत अखेर निलेश लंके यांनी जिंकली. कोविड सेंटरमुळे राज्यात झालेला लौकिक आणि भाजप सरकारविरुद्ध जनतेमध्ये असलेला रोष या सर्व बाबी लंके यांना विजयाकडे घेऊन गेला, इंग्रजी-मराठीचा वाद, प्रशासनाचा … Read more

Ahmednagar News : नगर-शिर्डीत थोरात ठरले किमयागार ! ‘अशी’ फिरविली गणिते

Ahmednagar News : शिर्डी मतदार संघातून भाऊसाहेब वाकचौरे यांनी ४५ हजारांपेक्षा मते घेत महायुतीचे उमदेवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला तर अहमदनगर लोकसभा मतदारसंघात देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) निलेश लंके हे देखील आघाडीवर आहेत. नगर आणि शिर्डी मतदार संघातून धक्कादायक निकाल लागण्यास आमदार बाळासाहेब थोरात यांचे खास कारणीभूत ठरले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी … Read more

Ahmednagar News : भाज्या, कडधान्यांपाठोपाठ तांदूळ महागला ; पुढील काळात दरवाढीची शक्यता?

Ahmednagar News : सध्या सर्वसामान्यांना दुष्काळाच्या झळायासोबतच महागाईचे चटके देखील बसत आहेत. सध्या तांदळाच्या होलसेल किमतीमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळते. तांदळाची आवक कमी झाल्यामुळे आणि हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे तांदळाच्या किमती वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. तांदळाच्या किमतींमध्ये एका किलोमध्ये तीन ते चार रुपये वाढ झाली असून याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. दरम्यान, बाजारात … Read more

Ahmednagar News : विधान परिषद,पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत ‘महायुतीत बिघाडी तर आघाडीत एकी’ !

Ahmednagar News : विधान परिषदेच्या कोकण आणि मुंबई पदवीधर तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील चारही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढण्याची चिन्हे दिसत असली तरी महाविकास आघाडीत अद्याप एकी दिसत आहे. भाजपने सोमवारी सकाळी आपले तीन उमेदवार जाहीर केले. कोकण पदवीधरमधून विद्यमान आमदार निरंजन डावखरे, मुंबई पदवीधरमधून किरण शेलार, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांची … Read more

Ahmednagar News : पृथ्वीच्या अतिशय जवळून हा राक्षसी धूमकेतू : मात्र पृथ्वीला त्यापासून धोका नाही

Ahmednagar News : अंतराळात जसे अनेक तारे व ग्रह आहेत तसेच धूमकेतू देखील आहेत. अंतराळातील असाच एक धूमकेतू पृथ्वीच्या अतिशय जवळून जात असून त्याला हॉनेंड धूमकेतू म्हणतात, ज्याच्यावर सातत्याने स्फोट होत असल्याने या स्फोटांच्या मालिकेसाठी हॉर्नेड धूमकेतून प्रसिद्ध आहे. त्याच्या विशिष्ट आकारामुळे त्याला डेव्हिल धूमकेतू किंवा राक्षसी धूमकेतू असेही म्हणतात. हा राक्षसी धूमकेतू मे महिन्याच्या … Read more

Ahmednagar News : दुष्काळी परिस्थितीमुळे जनता हवालदिल तर पुढारी राजकारणात मश्गुल

Ahmednagar News : यावर्षीचा उन्हाळा आतापर्यंतच्या सर्वात जास्त कडक उन्हाळा म्हणून नोंदला गेला, यावर्षी एप्रिल आणि मे मध्ये सरासरी ३९ ते ४० अंश तापमान राहीले. पाऊस सरासरीच्या फक्त ४० टक्के झाला, त्यामुळे तलावात पाणी साचले नाही की, शेतात पाणी वाहिले नाही, त्यामुळे विहिरींची पाण्याची पातळी वाढली नाही. त्याचा परिणाम फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची भीषणता जाणवायला लागली. पाणी … Read more

Ahmednagar News : मळगंगा देवस्थान ट्रस्टवर सत्ताधारी मळगंगा पॅनलचे वर्चस्व; विरोधकांना अवघी एक जागा

Ahmednagar News : राज्यात नावलौकिक असलेल्या श्री मळगंगा देवस्थान ट्रस्टच्या २१ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी मळगंगा पॅनलने २० जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळाले तर विरोधी माऊली मळगंगा पॅनल १ जागा मिळाली. सकाळी ८ वा. सुरू झालेले मतदान सायंकाळी ४ वाजता संपले. ४.१५ वाजता सुरु झालेली मतमोजणी रात्री उशिरापर्यंत चालली. रात्री १२ वा. मुख्य निवडणूक निर्णय … Read more

Ahmednagar News : केस मागे घेतली नाही म्हणून धारदार हत्याराने वार करत महिलेवर केले अत्याचार

atyachar

Ahmednagar News : तीन वर्षांपासून न्यायालयात सुरू असलेली केस मागे घेतली नाही म्हणून शेतात काम करणाऱ्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर धारदार हत्याराने वार करत अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास … Read more

Ahmednagar News : चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गोळीबार ;नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीचा थरार

Ahmednagar News : विकलेल्या चारचाकी गाडीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील वादातून एकावर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची घटना नेवासा तालुक्यातील टोका शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली तोडमल (रा. नेवासा खुर्द) याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात नुकताच खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

Ahmednagar News : कोल्हार भगवतीपूरला वादळाचा तडाखा, मोठमोठे वृक्ष आडवे ; शेडवरील पत्रे उडाले

Ahmednagar News : राहाता तालुक्यातील कोल्हार भगवतीपूरमध्ये सोमवारी विजेचा कडकडाट व ढगांच्या गडगडासह अवघा १० मिनिटे वळव्याचा पाऊस झाला. मात्र सोसाट्याच्या वारा व वादळाने मोठमोठे वृक्ष उन्मळून रस्त्यावर आडवे झाले. अनेक शेडवरील पत्रे दूरवर उडून पडल्याने पहिल्याच पावसाने कमी पण वादळाच्या तडाख्याने जास्त दाणादाण उडविली. सायंकाळी पाच नंतर अचानक आभाळ झाकोळले आणि काही मिनिटेच आलेल्या … Read more

Ahmednagar News : लोकसभा निकालानंतर अतिउत्साह दाखवू नका ; पोलिसांनी घातले ‘हे’ निर्बंध

Ahmednagar News : मंगळवारी, ४ रोजी लोकसभेची मतमोजणी सुरु आहे. त्यानंतर निकाल जाहीर केला जाणार आहे. मात्र निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांसह त्यांचे समर्थक डीजेच्या दणदणाटात गुलालाची उधळण करत मिरवणूक काढतात. मात्र पोलिसांनी काही निर्बंध घातले आहेत. लोकसभा निकालानंतर सोशल मीडियाद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप ग्रुप व इतर माध्यमाद्वारे कोणत्याही समाजाच्या, जातीच्या, धर्माच्या भावना दुखावतील अशा … Read more