तापमान ३८ अंशावर; उद्या नगर जिल्ह्यात यलो अलर्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर शहर व परिसरात मंगळवारी तापमानात १ अंशाने वाढ झाली. ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी कडक उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत होता. मंगळ वारी शहराचे तापमान ३८ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुढचे तीन दिवस पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात कुठेही पावसाची नोंद नाही. मात्र गुरुवारी, ११ एप्रिल ला जिल्ह्यात येलो अलर्ट … Read more

गतवर्षीच्या तुलनेत ९ टक्क्यांनी जिल्ह्यात वाढली विदेशी मद्यविक्री

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याचे आढळून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विदेशी दारूची विक्री ९ टक्के, तर बिअरची विक्री ११ टक्क्यांनी वाढली आहे. देशी दारूची विक्री मात्र मागील वर्षीच्या तुलनेत कमी झाली आहे. तर विदेशी दारूची विक्री वाढली आहे. राज्य उत्पादन शुल्क … Read more

कोकण कड्यावरून दरीत पडून घाटकोपर येथील तरुणीचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील कळसुबाई-हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यातील हरिश्चंद्रगड शिखर परिसरातील धोकादायक ‘कोकण कड्यावरून खोल दरीत पडून घाटकोपर (मुंबई) येथील २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला. रविवारी (७ एप्रिल) दुपारी ही घटना घडली. अवनी मावजी भानुशाली (वय २२, रा. घाटकोपर, पश्चिम मुंबई) असे मृत तरुणाचे नाव आहे. घाटकोपर येथील अवनी भानुशाली ही रविवारी हरिश्चंद्रगडावर पर्यटनासाठी आली … Read more

बोगस ओळखपत्र बनविण्याचा धंदा तेजीत

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बोगस ओळखपत्रे तयार करण्याचा गोरखधंदा जोरात सुरू असल्याचा आरोप बेलापूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुनिल मुथ्था यांनी केला आहे. या माध्यमातून बोगस मतदान होण्याची भीती व्यक्त करून याला आळा घालण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ओळखपत्र पडताळणी यंत्रणा हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत मुथ्था यांनी पत्रकारांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मांजराला वाचवायला गेलेले पाच जण विहिरीत बुडाले ! गावावर शोककळा…

Ahmednagar News

Ahmednagar Breaking : बायोगॅसची स्लरी सोडण्यात आलेल्या विहिरीत पाच जण बुडाले. तर ग्रामस्थांनी एक जणाला वाचविले. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील वाकड़ी या गावात मंगळवारी (दि. ९ एप्रिल) गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की नेवासा तालुक्यातील वाकडी या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो पाणी जपून वापरण्याची सवय लावा ! तब्बल ‘इतकी’ पाणी कपात होणार, पाटबंधारे विभागाकडून पत्र

water shortage

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर सध्या पाणी टंचाईचे सावट पसरले आहे. अनेक धरणातील पाणीसाठा निम्मा झाला आहे तर काही पाणवठे आटले आहेत. जायकवाडीला पाणी सोडल्याने मुळा धरणातील पाण्यावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. मुळा धरणातून होणाऱ्या पाणी पुरवठ्यात २० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला असल्याने … Read more

मोठा निर्णय ! आता थेट सातवे वर्ष लागल्यावरच पहिलीला प्रवेश, नर्सरीसह केजीचीही वयोमर्यादा ठरली

Ahmednagar News

Ahmednagar News : शिक्षण हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग आहे. आजकाल शिक्षणाला अत्यंत महत्व प्राप्त झाले असून स्पर्धेच्या जीवनात टिकण्यासाठी पालकवर्ग आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी अत्यंत सजग दिसून येतो. या मध्ये बऱ्याचदा आपली पाल्ये लवकरच शाळेत घातली जातात. नर्सरी असेल किंवा केजी असेल किंवा पहिलीतील प्रवेश असेल पालक आपल्या पाल्यास शाळेत घालण्याची घाई करतात. परंतु आता … Read more

Ahmednagar News : कांद्याच्या दरात मोठी घसरण, मिळतोय ‘हा’ भाव ! निर्यातबंदी उठवल्याचा फायदा नाहीच..

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यात अहमदनगर जिल्हा आता आघाडीवर येऊ लागला आहे. नगदी पीक असल्याने शेतकऱ्यांनी इतर पिकापेक्षा कांद्याकडे आपला मोर्चा वळवला. परंतु या वर्षात निर्यातबंदीचे ग्रहण लागले आणि कांद्याचे दर खूपच घसरले. यावर गदारोळ झाल्यानंतर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवल्याची चर्चा झाली. त्यामुळे कांदा २ हजार रुपये प्रतिक्विंटलवर … Read more

मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार: खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विजयाची गुढी उभारणार असा विश्वास विद्यमान खासदार आणि दक्षिण अहिल्यानगर मतदार संघाचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. पारिजात पार्क येथील गुढीपाडव्याच्या निमित्त आयोजित केलेल्या शोभा यात्रेत ते बोलत होते. देशाचा निकाल ठरला असून, नरेंद्र मोदीच हे पुन्हा देशाचे पंतप्रधान असतील असेही त्यांनी लोकांना संबोधित … Read more

Ahmednagar Politics : शिर्डी तापली ! खा.लोखंडेंनी खरोखर करोडोंचे अनुदान लाटले ? काय आहे वास्तव?

Ahmednagar News

Ahmednagar Politics : लोकसभेचा फिव्हर जसजसा वाढू लागला तसतसे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. आता आरोप प्रत्यारोपांची राळ उडू लागली आहे. दक्षिणेत लंके विरोधात विखे अशी तगडी फाईट लागली आहे. तर शिर्डीतही वातावरण चांगलेच गरम झाले आहे. आता शिर्डीत आरोपांची राळ उडाली आहे. नुकतेच शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट व डॉ. भरत कर्डक यांनी खा. … Read more

Ahmednagar News : नगरमधील अकोलेत पाडव्यास जंगल जाळण्याची परंपरा ! हजारो वनस्पती, प्राणी जळून खाक.. यामागे दडले ‘बड्या’ सिस्टीमचे काळे कारनामे? पहा वास्तव..

Ahmednagar News

Ahmednagar News : अनेक ठिकाणी भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळ्या परंपरा पाहायला मिळतात. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे जंगल जाळण्याची एक प्रथा पाहावयास मिळते. गुढीपाडव्याच्या अगोदर चार-दोन दिवस असे प्रकार केले जातात. यावर्षीही अशा अनके घटना अकोलेत घडलेल्या आहेत. यामध्ये कान्हा, सुतारी, घोडी, ढग्या, कळंबदरा, लग्न्या, मोग्रस, पांगरी, नाचणठाव, करंडीची वारंगी आदी डोंगरे व त्यावरील वन संपदा जाळून … Read more

Ahmednagar News : ‘संपदा’चे वाफारे ! पतसंस्थेच्या पैशातून गाडी, बांगला अन मौजमजा, अनेक धक्कादायक पैलू समोर, उद्या शिक्षेबाबत अंतिम सुनावणी..

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्हा तसा सहकाराचा. सहकार क्षेत्रात आदर्श घालून दिलेल्या जिल्ह्यात मागील काही दिवसात या सहकाराचे धिंडवडे काढायचे प्रकार घडल्याचे समोर आले. दरम्यान संपदा नागरी सहकारी पतसंस्था घोटाळा प्रकरण राज्यभर गाजले. यात ज्ञानदेव वाफारे हा मुख्य आरोपी असून त्याच्यासह १७ आरोपी आहेत. १७ आरोपींच्या शिक्षेबाबत अंतिम निर्णय बुधवारी (दि. १०) देणार असल्याचे जाहीर … Read more

Ahmednagar News : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! बदल्यांची तयारी सुरू, सेवाज्येष्ठता याद्या करण्याच्या सूचना, ‘अशी’ असणार प्रक्रिया

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषद अर्थात झेडपीला मिनी मंत्रालय असेही म्हणतात. जिल्हा परिषदेचा कामाचा डोलारा मोठा असल्याने कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ही नेहमीच चर्चेत असते. त्यामागे विविध पैलू देखील आहेत. दरम्यान आता यंदाच्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्यांची तयारी जिल्हा परिषद प्रशासनाकडून सुरु झालीये. यामध्ये शिक्षकांचा सहभाग नसणार आहे. ते … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये पाण्याची आणीबाणी ! धरणात पाणी तरी आवर्तन कमी, शेतकरी हतबल

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाणी संकट गहिरे झाले आहे. समन्यायी मुळे पाणी जायकवाडीला गेले व उत्तरेत पाणी टंचाई निर्माण झाली. आवर्तनाचा कालावधी कमी करण्यात आला. तर दक्षिणेतही पाण्याची आणीबाणी निर्माण झाली आहे. डिंभे धरणात पाणीसाठा असूनही दक्षिणेतील तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील कुकडीचे आवर्तन रविवारी सकाळी बंद करण्यात आल्याने ‘टेल’कडील … Read more

Ahmednagar News : नेतेमंडळींचे अपयश अहमदनगरकरांना धक्का ! समन्यायी पाणीवाटप याचिका निकाली, जायकवाडीला पाणी सोडावेच लागणार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यावर पाणीटंचाईचे भीषण संकट उभे राहिले आहे. यंदा पावसाची हजेरी अत्यल्प राहिली. परंतु त्यानंतर आहे ते पाणी देखील समन्यायी कायद्यानुसार जायकवाडीला सोडण्यात आले. या समन्यायी पाणीवाटप कायद्यासंदर्भात जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका निकाली काढण्यात आल्याने नगरसह नाशिक जिल्ह्याला धक्का बसला आहे. दोन एप्रिलला याचिका … Read more

Ahmednagar News : नगरमधील उड्डाणपुलाच्या सिमेंटचा तुकडा निखळला, थेट कारवर येऊन आदळला ! मोठी दुर्घटना..

news

Ahmednagar News : नगर शहरातील उड्डाणपुलावर अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आता उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या कारवर उड्डाणपुलाला आधार म्हणून लावलेल्या खांबाचा एक सिमेंटचा तुकडा निखळल्याने अपघात झाला. हा निखळलेला तुकडा चालत्या कारच्या काचेवर पडला. नगर शहरातील पुणे रोडवरील कोठी येथे ही घटना सोमवारी (दि. ७) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. यात कार चे नुकसान झाले … Read more

Ahmednagar Politics : गाढवाला गुळाची चव कशी कळणार ! लंकेंनी आपल्या बुडाखाली किती अंधार आहे हे आधी बघावे?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निलेश लंके यांनी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या साखर आणि डाळ वाटपाच्या उपक्रमावर आक्षेप घेतल्याने हिंदू अस्मितेला आघात केल्याची टीका अहिल्यानगरचे भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी केली आहे. लंकेच्या टीकेला परखड उत्तर देताना दिलीप भालसिंग म्हणाले की, ५०० वर्षापासून रखडलेल्या राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

हरिश्चंद्रगडाजवळ मधमाश्यांचा पर्यटकांवर हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील पर्यटकांचे आणि ट्रेकर्सचे आकर्षणाचे ठिकाण असलेल्या हरिश्चंद्रगडाजवळ कोथळे गावातील भैरवनाथ गडावर गेलेल्या पुण्यातील (कोथरूड) १३ पर्यटकांवर मधमाश्यांनी नुकताच हल्ला केला. त्यात सर्व १३ तरुण, तरुणी गंभीर जखमी झाले आहे. या हल्ल्यातील गंभीर जखमींवर राजूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी (दि.७) दुपारी ही घटना घडली. कोथरूड (पुणे) येथील १३ तरुण तरुणी … Read more