आ. रोहित पवार नगरकरांच्याही मदतीला…शहरात कोव्हीड सेंटरची उभारणी !

 

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोरोनाच्या या महामारीत विविध उपाययोजनांद्वारे कोरोनाचा प्रार्दुभाव रोखून रुग्णांना उत्तम आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार कटिबध्द आहेत.

दरम्यान कर्जत जामखेडसह जिल्ह्यातील इतर तालुक्यांचा जिल्हा रुग्णालयावर पडणारा भार लक्षात घेऊन या जाणिवेतून आ. रोहित पवारांनी कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून येथील पोलीस परेड ग्राऊंडवर कोव्हीड सेंटरची उभारणी केली आहे.

शुक्रवारी या कोव्हीड सेंटरचे उदघाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले असून लवकरच रुग्णांसाठी हे कोव्हीड सेंटर उपलब्ध होणार आहे.

आ. रोहित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये प्रशस्त व सुसज्ज जम्बो कोविड सेंटर उभारून नागरिकांच्या आरोग्य सुविधेची सोय केली आहे. जवळपास दोन हजार खाटांची क्षमता असणा-या या कोव्हीड सेंटरमधील रुग्ण चांगले उपचार घेऊन लवकर बरेही होत आहेत.

दरम्यान कर्जत जामखेडसह जिल्हातील विविध तालुक्यातील रुग्ण हे उपचारासाठी अहमदनरमधील रुग्णालयातही दाखल होत आहेत.

परिणामी येथील आरोग्य सुविधेवर ताण पडू नये म्हणून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आ. रोहित पवार यांनी अहमदनगर येथे कोव्हीड सेंटरची पर्यायी व्यवस्था केली.

कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्था, अहमदनगर महापालिका व सार्वजनिक विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगरमधील पोलीस परेड ग्राऊंड येथे उभारण्यात आलेल्या कोव्हिड केअर सेंटरचे उदघाटन अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रशस्त व सुसज्ज असे सर्व सुविधांनीयुक्त हे कोव्हीड सेंटर असून या कोव्हीड केअर सेंटरमध्ये ३०० खाटा असणार आहेत. तर येथील काही खाटा या ऑक्सीजन सुविधेसह असणार आहेत. पोलीस परेड ग्राऊंड येथील या कोव्हीड सेंटरकरिता सिव्हील रुग्णालयाची मोलाची साथ मिळाली.

तसेच आ. संग्राम भैय्या जगताप व महानगरपालिका यांचेही या कोव्हीड सेंटरकरिता मोलाचे सहकार्य आहे. त्यांच्या माध्यमातून कोव्हीड सेंटरसाठी आवश्यक मनुष्यबळ, रुग्णांकरिता जेवण पुरवण्यात येणार असून स्वच्छता, येथील दैनंदिन नियोजनाची जबाबादारी महानगरपालिका पाहणार आहे.

यावेळी उदघाटनप्रसंगी कर्जत जामखेडचे आ. रोहित पवार, आ. संग्राम भैय्या जगताप, आ. आशितोष काळे, आ. डॉ. किरण लहामटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. पोखरणा,

महानरपालिका आयुक्त शंकर गोरे, जिल्हा परिषद मुख्याधिकारी जगन्नाथ भोर, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|