अनेक जणांना दारू तसेच बियर,वाईन प्यायची सवय असते. तसं पाहायला गेले तर दारूमध्ये अनेक वेगवेगळ प्रकार येतात. उदाहरणच घ्यायचे झाले तर दारूमध्ये रम तसेच व्हिस्की यासारख्या प्रकारांना मोठ्या प्रमाणावर तळीरामांकडून पसंती दिली जाते. तसेच त्यासोबत वाईन आणि बियर देखील मोठ्या प्रमाणावर पिणाऱ्यांची संख्या देखील प्रचंड आहे.
यामध्ये दारू किंवा वाईनचा विचार केला तर यातील काही प्रकारांचे दारू तुम्ही बरेच वर्षे झाली तरी देखील पिऊ शकतात. परंतु बिअरच्या बाबतीत असे होत नाही. कारण बियर जर खूप दिवसांपूर्वी असेल तर ती न पिणेच फायद्याचे ठरते. कारण बियरला एक्सपायरी डेट असते व त्यामुळे ती डेट पाहूनच बियर विकत घेऊन पिणे फायद्याचे ठरते.
किती असते बिअरची एक्सपायरी डेट?
अनेक लोकांना सवय असते की जेव्हा ते एखाद्या वाईन शॉप किंवा बारमध्ये जातात तेव्हा बियर खरेदी करतात. परंतु खरेदी करताना मात्र बियरवर असलेली एक्सपायरी डेट कोणीच बघत नाही. कारण बऱ्याच लोकांना अजून देखील माहित नाही की बियरला देखील एक्सपायरी डेट असते. त्यामुळे त्याबद्दल कुठलीही माहिती न घेता बियरचे सेवन केले जाते.
परंतु यामुळे नुकसान होण्याची शक्यता असते. साधारणपणे जर बिअरच्या एक्सपायरी डेट बद्दल बोलायचे झाले तर साधारणपणे बहुतेक बियरची एक्सपायरी डेट सहा महिन्याची असते. म्हणजेच तिच्या मॅन्युफॅक्चरिंग तारखेपासून सहा महिन्यात तिची एक्सपायरी डेट संपत असते.
त्यामुळे तुम्ही जेव्हाही बियर खरेदी कराल तेव्हा तिची उत्पादनाची तारीख आणि तिची एक्सपायरी डेट तपासूनच खरेदी करणे खूप गरजेचे आहे. याव्यतिरिक्त जर बियर कुठून गळत असेल किंवा तिची गळती होत असेल तर अशी बियर विकत घेऊन ती बियर पिणे देखील नुकसान कारक आहे. कारण यामुळे अल्कोहोलची विषबाधा होण्याची शक्यता असते व त्यामुळे व्यक्ती आजारी देखील पडू शकतो.
बियर का खराब होत असेल?
आता आपल्या मनामध्ये प्रश्न होतो की दारूचे काही प्रकार किंवा वाईन किती दिवस झाले तरी तिला एक्सपायरी डेट नसते किंवा ती खराब होत नाही. त्यामागील प्रमुख कारण बघितले तर वाईन बनवण्याची जी काही पद्धत आहे ती बियर बनवण्याच्या पद्धतीपेक्षा पूर्ण वेगळी आहे.
यामध्ये अल्कोहोलचे प्रमाण जास्त असल्याने ते वाईनला खराब होऊ देत नाही. परंतु त्या तुलनेत मात्र बियरमध्ये सहा ते सात टक्के अल्कोहोल असते व बिअरच्या निर्मितीमध्ये धान्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो व त्यामुळेच काही कालावधीनंतर बियर खराब होते.
अनेकदा आपण पाहतो की काही विक्रेते सवलतीच्या दरात बियर विकतात. परंतु जर या मागील खरे कारण पाहिले तर संबंधित बिअरची एक्सपायरी डेट संपणार असते व त्यामुळेच विक्रेते अशा पद्धतीने विक्री करत असतात. त्यामुळे तुम्ही जेव्हाही बियर विकत घ्याल तेव्हा तिची एक्सपायरी डेट नक्की तपासून घेणे गरजेचे आहे.
समजा तुम्ही जर बियर खरेदी केली आणि तिची एक्सपायरी डेट जर संपलेली असेल तर त्याची माहिती तुम्ही संबंधित दुकानदाराला देऊ शकतात किंवा ताबडतोब उत्पादन शुल्क विभागाकडे तक्रार देखील करू शकता.