‘मातोश्री’वर बसून हकालपट्टी करणे एवढेच काम शिल्लक राहिले आहे का?- रामदास कदम

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर शिवसेनेला गळतीच लागली आहे. शिवसेनेच्या आमदारांनी शिवसेनेला रामराम करत शिंदे आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर पक्षाविरोधात कारवाया केल्याचे सांगत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारेंची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर आता शिवसेनेचे रामदास कदम यांना देखील पक्षातून हकालपट्टी केल्याचे समोर आले. त्यावर आता रामदास कदमांनी प्रतिक्रिया दिली आहे. … Read more

“आज तुम्हाला गुदगुल्या होत आहेत, पण उद्या हे पाप स्वस्थ बसू देणार नाही”

नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिवेसना खासदार संजय राऊत यांनी यावरुन एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. ‘प्रत्येक राज्य आपल्या समस्या घेऊन दिल्लीत येत असते. त्यासंबंधी टीका करणार नाही. पण जर सरकार स्थापनेसाठी मान्यता किंवा मंत्रिमंडळाची यादी घेऊन आले असतील तर महाराष्ट्र डोळे वरुन करुन त्यांच्याकडे पाहणार’, असे संजय राऊतांनी … Read more

शिंदे गटात जाणाऱ्या संभाव्य खासदारांच्या घर, कार्यालयाला सुरक्षा कवच

नवी दिल्ली : शिंदे गटात जाणाऱ्या शिवसेनेच्या संभाव्य खासदारांना सुरक्षा कवच देण्यात आले आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे आणि रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या घर आणि कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या संभाव्य खासदारांना सुरक्षा पुरवण्यात येत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवसेनेचे खासदारही बंड करण्याची शक्यता … Read more

सत्तेची भांग पिणारे उद्या ‘मातोश्री’वर कब्जा करतील- संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका, आरोप करण्याचे सत्र सुरु झाले ते अद्यापही संपले नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटावर सडकून टीका केली आहे.   नशेची, सत्तेची, बेईमानीची भांग पिणारे उद्या मातोश्री आमचे आहे असाही दावा करु शकतात, अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि … Read more

…तर हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही; राऊत पुन्हा शिंदे सरकारवर बरसले

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकार, मोदी सरकारसह राज्यपालांवरही टीका केली आहे. महाराष्ट्रात घटनाबाह्य गोष्टी घडत असताना राज्यपाल कुठे आहेत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. महाविकास आघाडी सरकारनं 5 महत्त्वाचे निर्णय घेतले होते, त्यांना स्थगिती दिली किंवा रद्द असं काल मला समजलं. काही वेळापूर्वीच माझी उद्धव ठाकरेंशी चर्चा झाली. … Read more

ठाकरेंचा एवढा पुळका येत असेल तर मातेश्रीवर जाऊन भांडी घासा; निलेश राणे केसरकरांवर आक्रमक

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्याशी माझा कोणताही वैयक्तिक वाद नाही. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर बोलणे टाळावे. त्यानंतर माझा कोणताही त्यांच्याशी वाद राहणार नाही, असे शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. किरीट सोमय्या मातोश्रीवर बोलण्याचे टाळू शकतात तर राणे यांना काय कठीण नाही, असे दीपक केसरकर म्हणाले होते. केरसकरांच्या … Read more

राज्यपालांना उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करावं लागेल- जयंत पाटील

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्ता स्थापन केली आणि महाविकास आघाडीचे सरकार क्षणार्धात कोसळले. त्यावरुन एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गट आणि भाजप असा चांगलाच कलगितुरा रंगला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील … Read more

मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री म्हणजे सरकार नाही; संजय राऊतांची टीका

मुंबई : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर शिवसेनेमधील दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर सडकून टीका करत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी नव्या सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्र पुन्हा एकदा लॉकडाऊनमध्ये गेला आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतरही मंत्रिमंडळाचा विस्तार … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मुर्मू आज मुंबईत; पण ‘मातोश्री’वर जाणार नाहीत!

मुंबई : एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या आज मुंबईमध्ये येणार असून भाजप आणि शिंदे गटाच्या आमदरांसोबत त्यांची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवेसेनेच्या शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिला आहे. द्रौपदी मुर्मू या मातोश्रीवर जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराने मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव … Read more

ठाकरे गटाला मोठा धक्का; सेनेच्या १५ खासदारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील ५५ पैकी तब्बल ४० आमदारांच्या साथीने बंड पुकारले आणि या सर्वांच्या बंडखोरीमुळे राज्यात नवा सत्ताबदल झाला. या बंडखोरीने हैराण झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण शिवसेनेच्या तब्बल १५ खासदारांनी बुधवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर … Read more

दीपक केसरकर उडते पक्षी; किशोरी पेडणेकर आक्रमक

मुंबई : आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर अभिवादन करण्यासाठी गर्दी केली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या देखील बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कवर आल्या होत्या. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका करणाऱ्या शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांच्यावर पेडणेकरांनी चांगलीच आगपाखड केली आहे. दीपक केसरकर उडते पक्षी आहेत. येथून उड … Read more

बंडखोरांना जागा दाखवण्याची भाषा करणाऱ्याच शीतल म्हात्रे शिंदे गटात सामील

मुंबई : शिवसेनेच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंसोबत निष्ठावान राहिलेल्या शीतल म्हात्रेंच्या निर्णयाने शिवसेनेत मोठी खळबळ उडाली आहे. शीतल म्हात्रेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुंबईतील निवासस्थानी शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसह त्यांची भेट घेतली आहे. शिंदे गटाच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणाची समीकरणं … Read more

शिवसैनिक कधीही शरद पवारांच्या दावणीला बांधला जाणार नाही- दीपक केसरकर

मुंबई : शिवसेनेचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना दीपक केसरकरांनी शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले आहे. मातोश्री कधी सिल्व्हर ओकच्या दारी गेल्याचं मी ऐकलेलं नाही. आपला पक्ष मोठा व्हावा, तो सत्तेत असावा ही … Read more

नारायण राणेंना शिवसेना सोडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली; सेना आमदाराचा गौप्यस्फोट

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी छगन भुजबळ आणि नारायण राणे यांनी शिवसेनेतून बाहेर पडताना सेनेत फूट पाहायला मिळाली होती. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. नारायण राणेंना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी शरद पवारांनीच मदत केली आहे, असा दावा दीपक केसरकरांनी … Read more

बाळासाहेब असते तर अशा लोकांना आपल्या शैलीत उत्तर दिलं असतं; राऊतांची शिंदे गटावर टीका

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करणारे ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फोटो शेअर केला आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या ट्विटवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंवर टीका केली आहे. बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेलेले ते आमचे गुरु असल्याचे सांगत आहेत … Read more

कोश्यारींनी आता इतर मंत्र्यांना शपथ देऊ नये अन्यथा..; राऊत राज्यपालांवर आक्रमक

मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे गटाने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमदेवार द्रौपदी मुर्मू यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख्य उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. याचवेळी संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि राज्यपाल भगत सिंग कोश्यारी भूमिकेवर आक्रमकपणे टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालय प्रकरण प्रलंबित असताना स्थापन झालेले हे … Read more

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूंना उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

मुंबई : राष्ट्रपतीपदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जाहिर पाठिंबा दिला आहे. तशी घोषणाच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. आत्ता महाराष्ट्रात चाललेलं राजकारण पाहता मी पाठिंब्यासाठी विरोध करायला हवा होता. पण राष्ट्रपतीपदाच्या निवडीसंदर्भात शिवसेनेने नेहमीच वेगळी भूमिका घेतली आहे. ‘शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे, असा सांगतानाच मी कोत्या … Read more

“अशा आमदारांना राज्यपाल शपथ देणार असतील तर डॉ. आंबेडकरांची घटना उद्धवस्त झाली…”

मुंबई : शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत विधानसभा उपाध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये असे आदेश दिले आहेत. यावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना अग्रलेखामध्ये न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे म्हंटले आहे. तसेच भाजपवर सडकून टीका देखील केली आहे. महाराष्ट्रातील सरकारच्या भवितव्याचा फैसला 11 तारखेस सर्वोच्च न्यायालयात होणार होता, पण फैसला पुढे ढकलण्यात … Read more