Remal Cyclone: रेमल चक्रीवादळाने हवामानात केला मोठा बदल! मान्सून आणि महाराष्ट्रावर काय होईल याचा परिणाम? वाचा माहिती

Ajay Patil
Updated:
remal cyclone

 

Remal Cyclone:- सध्या संपूर्ण भारत हा उष्णतेच्या लाटेमुळे त्रस्त असल्याची परिस्थिती महाराष्ट्र देखील आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणी पारा 42 अंशाच्या पुढे असून प्रचंड प्रमाणात उकाड्याने नागरिक त्रस्त झाल्याची स्थिती आहे. या सगळ्या त्रासदायिक परिस्थितीतून दिलासा देणारी बातमी म्हणजे मोसमी पावसाची वाटचाल ही होय.

कारण अंदमान बेटांवर मान्सूनने प्रवेश केला होता व काही दिवसात केरळ व महाराष्ट्रात असा एकंदरीत मान्सूनचा प्रवास वेळेत होईल असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु मध्येच रेमल चक्रीवादळाचे नवे संकट संपूर्ण देशावर घोंगावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

त्यामुळे अवघ्या काही दिवसात केरळ आणि महाराष्ट्रात पोहोचणाऱ्या मोसमी पावसाला यामुळे काही समस्या निर्माण होऊ शकते का? हा एक मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. या चक्रीवादळाने हा पुन्हा एकदा हवामानाचे गणित पालटले आहे. कारण या चक्रीवादळामुळे मोसमी पावसाची जी काही वाटचाल आहे त्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत असून पावसाची वाटचाल काहीशी मंदावली असल्याचे चित्र  आहे.

 रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम

याबाबत सविस्तर वृत्त असे की, केरळमध्ये जेव्हा मोसमी पाऊस पोहोचतो त्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये येतो. साधारणपणे जर आपण मोसमी पावसाचा प्रवास पाहिला तर तो अंदमान व त्या ठिकाणाहून केरळ व नंतर महाराष्ट्र असा असतो. त्यानुसार मोसमी पाऊस अंदमान मध्ये पोहोचला होता व काही काळानंतर तो केरळ व महाराष्ट्रात पोहोचायला काही दिवसच शिल्लक राहिले होते.

अशातच भारतावर आता रेमल या चक्रीवादळाचे संकट निर्माण झाले असून या चक्रीवादळाने भारताकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता मोसमी पावसाच्या वाटचालीवर परिणाम होत असून  आतापर्यंत वेगात प्रवास करत असलेल्या मोसमी पावसाची वाटचाल काहीशी मंदावल्याची स्थिती आहे.

सध्या जर बघितले तर मोसमी पाऊस केरळमध्ये 31 मे व महाराष्ट्रात दहा ते अकरा जून च्या दरम्यान दाखल होऊ शकतो. परंतु आता चक्रीवादळामुळे झालेल्या हवामान बदलाने मोसमी पावसाच्या आगमन लांबू शकते किंवा त्याला उशीर होऊ शकतो अशी देखील शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काही तासांमध्ये हे चक्रीवादळ बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा काय परिणाम होणार?

चक्रीवादळामुळे आता ओडिशा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून येणाऱ्या 24 तासांमध्ये या चक्रीवादळामुळे हवामानावर आणखी काही परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रावर या चक्रीवादळाचा थेट परिणाम होणार नसल्याचे देखील भारतीय हवामान खात्याच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र विदर्भ व उत्तर मध्य महाराष्ट्राचा 27 मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा इशारा मात्र देण्यात आला आहे. कालपासून म्हणजेच 25 मे पासून विदर्भात तापमानाचा पारा आणखी वाढेल अशी शक्यता आहे.

तसेच राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता देखील हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तवण्यात आलेली आहे. राज्यातील दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात वादळी वारे व त्यासोबत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल.