Ahmednagar Breaking ! निलेश लंके यांच्या अभिनंदनाचा फलक लावणे पडले महागात ! कार्यकर्त्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

MLA Nilesh Lanke

Ahmednagar Breaking : लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके यांची खासदार पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन, असा फलक लावणाऱ्या कार्यकर्त्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ३०) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तन्वीर भैय्या अवतार (रा. पाथर्डी, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यात मिशन जलजीवनची कासवगती; तब्बल ७१८ पाणीयोजनांची कामे पूर्ण करण्याचे आव्हान

Ahmednagar News : केंद्र शासन व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जल जीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत “हर घर नल से जल” या उद्देशाने ग्रामीण भागातील सर्व कुटूंबाना वैयक्तीक नळ जोडणीद्वारे ५५ लिटर प्रतिदिन प्रतिव्यक्ती पाणी पुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुसार मार्च २०२४ पर्यंत सर्व मंजूर पाणीयोजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र, या … Read more

Ahmednagar News : अहमदनगर शहर परिसरात एकाच दिवशी ३ अपघात, तिघे ठार

accident

Ahmednagar News : अपघाताचे प्रमाण वाढले असून आता नगर शहर परिसरात काल गुरुवारी (दि. ३०) एकाच दिवसात तीन अपघात झाल्याच्या घटना घडल्याचे वृत्त आले आहे. मनमाड रोड, कल्याण रोड व केडगाव येथे झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार झाले आहेत. पहिला अपघात नगर कल्याण रोडवर रेल्वे उड्डाण पुलाच्या पुढे बायपास चौकाजवळ गुरुवारी (दि.३०) पहाटे १ … Read more

Ahmednagar News : अँप डाऊनलोड करण्यास सांगून नगरच्या नोकरदारास घातला सव्वादोन लाखांना गंडा

Ahmednagar News : सध्या सर्वकाही ऑनलाईन झाले आहे. नेमका याच गोष्टीचा फायदा काही भामटे घेत आहेत. आपण बँकेच्या कस्टमर केअर सेंटर मधून बोलतोय, असे सांगत बँक खात्याविषयीची तक्रार नोंदविण्यासाठी एक अँप डाऊनलोड करायला सांगितले. दरम्यान संबंधीताचा मोबाईल हॅक करून त्याच्या बँक खात्यातून चक्क २ लाख २८ हजारांची रक्कम ऑनलाईन काढुन घेत नगरमधील खाजगी नोकरदारास गंडा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ पोलीस ठाण्याचा हेड कॉन्स्टेबल लाचलुचपतच्या सापळ्यात

lachluchapat

Ahmednagar News : लाच घेणे व लाच देणे हे दोन्हीही कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगार असतात. लाच ही आपल्या यंत्रणेला लागली गेलेली भ्रष्ट कीड आहे. लाचलुचपतने याआधीही अनेक कारवाया करत अहमदनगरमधील अनेक विभागातूल विविध कर्मचारी जाळ्यात घेतलेले आहेत. परंतु तरीही लाच घेण्याचे प्रकार कमी होतानाचे चित्र नाही. आता पुन्हा एकदा एक लाचेचे प्रकरण समोर आलेले आहे. शेवगाव … Read more

Ahmednagar News : पती शेतात गेला, नराधम रात्री खोलीत शिरला, चाकूचा धाक दाखवत विवाहितेवर अत्याचार

atyachar

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्याच्या पूर्वेकडील एका गावात एका तरुणाने घरच्या वरील जिन्याच्या साह्याने घरात प्रवेश करून चाकूचा धाक दाखवत अत्याचार केला. त्यानंतर पीडितेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. श्रीगोंदा … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप ! विवेक कोल्हेंचा अपक्ष अर्ज… भाजपमध्ये बंडखोरी की आणखी काही प्लॅनिंग?

vivek kolhe

Ahmednagar Politics : लोकसभा संपताच सुरु झाली नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांची रणधुमाळी. निवडणूक जाहीर होताच अनके राजकीय गुंते समोर येऊ लागले व राजकीय संघर्ष कसा असेल याचेही चित्र जवळपास स्पष्ट होऊ लागले. ही निवडणूक शिक्षक केंद्रित न राहता राजकीय धुरंधरांच्या भोवती गुरफटत राहील अशी शक्यता निर्माण झाली. त्यात भाजपचे माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे … Read more

Ahmednagar News : आता आठवड्याच्या प्रत्येक मंगळवारी ग्रामविकास अधिकाऱ्यांची सीईओंसमोर होणार सुनावणी ; कामचुकारपणा केल्यास दिला ‘हा’ इशारा

Ahmednagar News : ‘सरकारी काम अन सहा महिने थांब’ अशी शासकीय कामाबाबत आपल्याकडे एक म्हण रूढ झाली आहे. म्हणजे सरकारी काम असेल तर ते कमी वेळेत पूर्ण होत नाही. मात्र बदलत्या काळानुसार आता सर्व बदलत असताना सरकारी यंत्रणा देखील बदलली पाहिजे. यासाठी जिल्हा परिषद व ग्रामीण भागातील दुवा म्हणजे ग्रामविकास अधिकारी. परंतु सध्या ग्रामविकास अधिकाऱ्यांवर … Read more

Ahmednagar News : फुलांचा बाजार कडाडला ; झेंडू १०० तर गुलाब ३०० रूपये किलो

Ahmednagar News : यंदा संपूर्ण राज्यभरात दुष्काळी परिस्थीती असल्याने पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे पाण्यावाचून उभी पिके करपून गेली आहेत. सध्या लग्नसराईचा मोसम सुरू आहे. लग्नसमारंभात सजावटीसाठी फुलांना मोठी मागणी असते. सभागृहांमध्ये, घरात फुलांची सजावट करण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे फुलांची मागणी वाढल्याचे दिसून येत आहे. फुलांची मागणी वाढल्याचा परिणाम दरावरही झाला आहे. … Read more

Ahmednagar News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांना ठेंगा ; कर्नाटकात मात्र निर्यात शुल्कात ४० टक्के सवलत

Onion Export

Ahmednagar News : महाराष्ट्रातून निर्यात होणाऱ्या उन्हाळ कांद्यावर लावलेले निर्यात शुल्क मात्र ‘जैसे थे’च ठेवत कर्नाटकातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने बंगळुरू ‘रोझ’ कांद्याला निर्यात शुल्कात ४० टक्के सवलत दिली. यामुळे आधीच कांद्याच्या पडलेल्या किमतीवरुन अडचणीत असलेल्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर सरकारने मीठ चोळण्याचे काम केले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या … Read more

Ahmednagar News : तीव्र पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांवर आली फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ

Ahmednagar News : विहिरी व बोरवेल तर यापूर्वीच कोरड्या पडल्या असून आता उरलीसुरली शेततळ्यांनी देखील तळ गाठल्यानंतर जिल्ह्यातील अनेक भागातील फळबागा जळण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आजवर टँकरच्या पाण्यावर फळबागा जगविण्याचे प्रयत्न केले. मात्र, हा खर्च आता डोईजड झाल्यानंतर अखेर पंधरा-वीस वर्षापासून पोटच्या मुलाप्रमाणे वाढवलेल्या संत्रा – मोसंबीच्या फळबागांवर कुऱ्हाड चालवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली … Read more

Ahmednagar News : चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढला, कारखान्यापुढे गाळप हंगामाचे संकट

farm

Ahmednagar News : यंदा पावसाने फिरवलेली पाठ व धरणातील आवर्तनात कमतरता यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यातच उष्णतेनेही परिसीमा गाठली आहे. याचा परिणाम म्हणजे शेतातील हिरवा चारा गायब झाला आहे. जनावरांना हिरवा चारा मिल्ने मुश्किल झाले असल्याने शेतकऱ्याने आता चाऱ्यासाठी उसाचा वापर वाढवला आहे. उसाला सध्या मागणी असल्याने तीन ते साडेतीन हजार रुपये टन एवढा … Read more

Ahmednagar News : नुकतेच पतीचे निधन, आता मुलाच्या किडन्या निकामी, आजी किडनी देतेय पण दवाखान्यासाठी पैसे नाही, आईची मदतीसाठी आर्त हाक

Ahmednagar News

Ahmednagar News : पती- पत्नी उदरनिर्वाहाचे कुठलेही साधन नाही..पती ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर काम करायचा..दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन..अन आता पोटच्या मुलाच्या दोन्ही किडन्या झाल्या निकामी..आजी किडनी द्यायला तयार झाली..पण..ते बदलायला येणारा मोठा खर्च तो झेपणारा नाही..ही कहाणी आहे अहमदनगरमधील.. पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथील एका आईने बारावीत शिकणाऱ्या मुलाच्या किडन्या बदलण्यासाठी मदतीची आर्त हाक दिली आहे. … Read more

Ahmednagar News : बसमधून उतरण्यास सांगितल्याने केले चालक व वाहकावर वार

Ahmednagar News : लाल परी म्हणजे ग्रामीण महागाची जीवनवाहिनीच, गाव खेड्यातील सर्वसामान्य नागरिकांना मुख्य प्रवाहात जोडण्याचे काम कोणी केले असेल तर ते एसटीने. मात्र सध्या याच एसटीच्या मुळावर अनेकजण उठले आहेत कि काय असा प्रश्न पडतो आहे. कोणतेही आंदोलन झाल्यास त्याचा सर्वाधिक फटका एसटीलाच बसतो.अनेकदा तर किरकोळ कारणावरून चालक व वाहकास मारहाण करण्याच्या देखील घटना … Read more

Ahmednagar News : ‘मुळा’त अवघा १ हजार ९२३ दलघफू जिवंत पाणीसाठा, जुलैपर्यंतच पिण्यास पाणी, शेतीचा तर प्रश्नच गंभीर

mula dam

Ahmednagar News : मुळा धरण हे दक्षिण नगरचा शेतीचा, पाण्याचा प्रश्न सोडवते. हजारो हेक्टर्स शेती या पाण्यावर अवलंबून आहे. तसेच लाखो लोकांची तहान हे धरण भागवत आहे. परंतु आता यंदा या धरणात पाणीसाठा अत्यंत कमी शिलकी राहिला आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच मोठे जलसंकट ओढवले आहे. या धरणाची २६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता आहे. … Read more

Ahmednagar News : वेश्या व्यवसाय छाप्यातील ‘पिटा’ नुसार कारवाई केलेली महिला सिव्हील हॉस्पिटलमधून पसार, नेमके काय घडले? पहा..

news

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून तुरुंगातून कैदी पसार होण्याच्या घटना यादी अनेकदा घडलेल्या आहेत. आता वेश्या व्यवसाय छाप्यातील ‘पिटा’ नुसार कारवाई केलेली महिला सिव्हील हॉस्पिटलमधून पसार झाल्याची घटना घडली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणवाडी परिसरातील एका हॉटेलवर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने छापा टाकलेला होता. यामध्ये कुंटणखाना चालवणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले होते. वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या पश्चिम बंगालमधील महिलेची … Read more

Ahmednagar Politics : मतमोजणी परिसरात मोबाइल, लॅपटॉप नेण्यावर बंदी, कलम १४४ लागू, सकाळी ८ वाजता सुरु होईल मतमोजणी, ‘अशी’ आहे तयारी

vikhe lanke

Ahmednagar Politics  : सर्वांनाच ज्या गोष्टीची प्रतीक्षा आहे अशा अहमदनगर, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणीला अवघे चार दिवस राहिले आहेत. येत्या ४ जूनला एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी होणार आहे. अहमदनगरची निवडणूक महाराष्ट्रासाठी लक्षवेधी ठरली. त्यासोबतच शिर्डीकडेही लोकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी आहे त्या परिसरात मोबाइल वापरण्यावर बंदी आहे. तसेच … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील व्यावसायिकाची आठ कोटींची फसवणूक, ‘त्या’ मल्टीस्टेटच्या चेअरमन, मॅनेजरवर गुन्हा

fraud

Ahmednagar News : जमीन-खरेदी विक्री व्यवहारात बांधकाम व्यावसायिकाची तब्बल आठ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी (३० मे) रात्री उशिरा कोतवाली पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल बबनराव जाधव (वय ४१, रा. विजयनगर, बोल्हेगाव फाटा, नगर) असे या व्यावसायिकाचे नाव … Read more