Ahmednagar News : मुळा धरणात ‘एवढं’च पाणी राहिलंय, दशकाच्या इतिहासातील सर्वात कमी पाणीसाठा, संकट गंभीर

mula dam

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उत्तरेसाठी व दक्षिणेतील अनेक गावांसाठी मुळा धरण वरदान ठरले आहे. शेतीसाठी व पिण्यासाठी हे धरण वरदान ठरत आहे. परंतु यंदा पाऊस कमी झाला तसेच जायकवाडीला देखील पाणी सोडल्याने मुळा धरणामध्ये पाणी कमी राहिले आहे. काल शनिवारी अवघा २,००३ दशलक्ष घनफूट उपयुक्त साठा शिल्लक होता. मागील वर्षी मे महिन्यात २५ तारखेला … Read more

Ahmednagar News : ‘नवऱ्याला मॅसेज करतेस,सुपारी देऊन मारील’, महिला डॉक्टरची परिचारिकेला घरात घुसून रॉडने मारहाण, अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील एका महिला डॉक्टरने परिचारिकेस घरात घुसून लोखंडी गजाने मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हिडिओमधूनच ही घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. २४) रात्री आठ वाजता घडली. परिचारिकेच्या फिर्यादीवरून डॉ. माधुरी जगताप विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

Ahmednagar News : आता चष्मा घाला व जगात कोठेही साधा आभासी संवाद, अहमदनगरच्या युवकाचा अमेरिकन संशोधकांसोबत नवीन शोध

Dr. Hemant Bhaskar Surle

Ahmednagar News :  जगात दररोज नवनवीन संशोधने होत आहेत. आता सध्या आपण मोबाईल किंवा पडद्यावरून जो आभासी संवाद साधतो तो आता थेट तुमच्या चष्म्यातून संवाद साधला जाऊ शकतो. स्मार्ट चष्मे वापरून विविध वापरकर्त्यांमध्ये आभासी संवाद सत्र आयोजित केले जाऊ शकते. होय हे खरे आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे जगात आभासी संवादाच्या नवीन पर्वाची सुरुवात होणार आहे. … Read more

Ahmednagar Politics : निवडणुकी इतकीच सट्टाबाजारातही विखे-लंके यांच्यात चुरस, एकास दोन, तीनचा भाव, कोण किती कमवेल?

lanke vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीच्या निकालाला आता अवघे दहा उरलेले आहेत. निवडणुकीमध्ये निलेश लंके व खा. सुजय विखे यांच्यामध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. दरम्यान आता ही चुरस सट्टाबाजारातही पाहायला मिळत असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार निलेश लंके व खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्यावर सट्टा लावला जात असून सट्टाबाजार चांगलाच तेजीत आला असल्याचे … Read more

Ahmednagar Breaking : सरपंच पतीला डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न, अहमदनगर मधील ‘या’ गावात थरार

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : सरपंच पतीच्या अंगावर डंपर घालून ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अवैध वाळू वाहतुकीला विरोध केल्याने ठार मारण्याचा प्रयत्न झाला असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना नेवासे तालुक्यातील जैनपूर येथे घाली आहे. यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी जिवे मारण्याचा … Read more

नीलेश लंकेंच्या सुप्यात अतिक्रमणांवर बुलडोजर, विखेंनी वचपा काढला? मंदिरही पाडल्याने भाजपच्या हिंदुत्ववादावर नेटकऱ्यांचे प्रश्नचिन्ह

lanke atikranman

Ahmednagar Politics : गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर शनिवार दि. २५ रोजी सकाळी ८ वाजता अतिक्रमणावर आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. सुपा बसस्थानक चौक ते पारनेर रस्त्यावर औद्योगिक वसाहत चौकापर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार ही अतिक्रमणे तात्काळ काढून घ्यावेत असे आदेश देण्यात आले … Read more

Ahmenagar Breaking : नगरमध्ये निवृत्त अप्पर जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचे अपहरण करुन लुटले, सुटकेसाठी १५ लाख मागितले

kidnap

Ahmenagar Breaking : नगरमधील युवकाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीत बसवून इमामपूर घाटात लुटले. तसेच, त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या वडिलांकडे १५ लाखांची खंडणी मागण्यात आली. पाथर्डी रस्त्यावर तिसगाव येथे गाडी थांबली असता त्याने गाडीतून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. अनिरुध्द विठ्ठलराव जरे (वय २५, मूळ रा. शिंगवे तुकाई, ता. नेवासा, … Read more

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महाबीजने सोयाबीन बियाणांच्या किमती केल्या बऱ्याच कमी, उडीद मात्र महागली

soya farming

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) सोयाबीन बियाणांचा दर प्रतिकिलो २५ रुपयांनी कमी केला आहे. यंदा २२ किलोची बॅग १८७० रुपयांना मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मागील हंगामापेक्षा ३३० रुपयांचा फायदा होणार आहे. तर, उडदाच्या पाच किलो बॅगची किंमत १२५ रुपयांनी महाग झाली आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात सोयाबीनच्या विविध वाणांना मागणी … Read more

Ahmednagar News : बिबट्यांचे चार वर्षात १२०० हल्ले, वन विभागाकडे फक्त २० पिंजरे..

bibatya

Ahmednagar News  : वन्यप्राण्यांचा अधिवास मानवाने नष्ट केला व त्याचा परिणाम असा झाला की वन्यप्राणी मानवी वस्तीत अतिक्रण करू लागले. अहमदनगर जिल्ह्यात अनेक गावांत बिबट्याची दहशत व धुमाकूळ पाहायला मिळत आहे. अगदी केडगाव, नगर शहर अशा भर वस्तीत देखील बिबट्याने दर्शन दिले आहे. ग्रामीण भागात तर बिबट्याचे हल्ले, पशुधनाचे मृत्यू हे अगदी नित्याचेच झालेय. नुकतीच … Read more

Ahmednagar News : हृदयद्रावक ! अहमदनगरमध्ये ‘येथे’ आढळले एक दिवसाचे बाळ, नाळही अर्धवट कापलेली, नाकातोंडात माती..

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदे तालुक्यातील शिरसगाव बोडखा शिवारात एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक बेवारस स्थितीत आढळून आले. स्थानिक लोकांच्या मदतीने व पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग व प्रशासनाच्या तत्परतेने या बाळाचे प्राण वाचवण्यात यश आले. शिरसगाव बोडखा येथील सूर्यवंशी वस्तीशेजारी अज्ञात इसमाने हे बाळ ठेवल्याचे स्थानिकांनी पाहिले. तेथील संतोष सूर्यवंशी यांनी श्रीगोंदे पोलिसांना फोन करून … Read more

Ahmednagar News : पुण्यातील ‘पोर्शे’ अपघातानंतर अहमदनगर पोलिसांची धडक मोहीम, विविध ठिकाणी नाकाबंदी, मद्यपींचा बंदोबस्त..

police

Ahmednagar News : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत अंदाधुंद कार चालविल्याने दोन निरपराधांचा बळी गेला. या घटनेने अहमदनगर पोलिस दल सतर्क झाले असून, मद्यपींच्या बंदोबस्तासाठी पोलिसांनी तीन दिवसांची विशेष मोहीम हाती घेतली आहे. पहिल्या दिवशी १४ मद्यपींवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अपर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी दिली. पुणे शहरातील कल्याणीनगर … Read more

रेशनधारकांसाठी महत्वाची बातमी, बोटांच्या ठशासाठी ताटकळण्याची गरज नाही, आता आली ‘ही’ नवीन सुविधा

ration

रेशन दुकानातून धान्य घेताना बहुधा अनेकांना एका समस्येचा सामना नकीच करावा लागला असेल आणि ती म्हणजे बोटांचे ठसे न जुळण्याची समस्या. अनेक लोकांना बोटांचे ठसे बोटांवरील रेषा पुसल्याने ई-पॉस मशीनवर देता येत नाहीत किंवा ते मशीन थम घेत नाही. यामुळे काहींना धान्य न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागते. परंतु आता प्रशासनाने यावर देखील एक उपाययोजना … Read more

Ahmednagar News : होय पप्पा, मी खरंच तुमची आहे..! मुलीची हौस असल्याने दत्तक घेतलं, पण.. बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्यानंतर वेदिकाच्या आठवणींनी वडील भावुक

vedika

Ahmednagar News : होय पप्पा, मी मम्मीची नाही खरंच तुमची आहे… हे बोल आहेत, बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीचे. गुरुवारी सकाळी राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडलेल्या घटनेनंतर वडील श्रीकांत ढगे चिमुकल्या वेदिकाच्या आठवणी सांगताना भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. दरम्यान घटनेनंतर वनविभागाने या परिसरात दोन पिंजरे लावले पण पहिल्या … Read more

Ahmednagar News : सहा मृत्युमुखी पडलेल्या प्रवरेत पुन्हा दोन विद्यार्थ्यांचा बुडून अंत

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगरमधील बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची मालिका अद्याप सुरूच आहे. अकोले तालुक्यातील प्रवरेतील केटीवेअर मधील जवानांसह सहा जण बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एक घटना घडली आहे. प्रवरा नदीच्या पात्रात बुडून आता आणखी दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना संगमनेर येथे घडली. शुक्रवारी (दि. २४) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास गंगामाई घाट परिसरात … Read more

Ahmednagar Politics : पवार-शिंदे या दोन आमदारांच्या श्रेयवादात कर्जतची एमआयडीसी मृगजळ ठरणार? काय आहे सद्यस्थिती? पहा..

shinde pawar

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील एमआयडीसीचा प्रश्न हा सध्या चर्चेत आहे. आ. रोहित पवार यांनी एमआयडीसीचा प्रश्न धसास लावला होता व केवळ एक सही बाकी होती असे ते म्हणालेत. तर दुसरीकडे आ. राम शिंदे यांनी एमआयडीसी हवी पण त्या जागेत नको असे सांगत आता एमआयडीसी साठी दुसरी जागा शोधली आहे. परंतु आता या … Read more

Ahmednagar News : बापाच्या डोळ्यादेखत पोटचा गोळा बिबट्याने उचलला, तीन वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

bibatya

Ahmednagar News :  हसतखेळत शेताकडून घराकडे चाललेल्या वेदिका ढगे या तीन वर्षीय चिमुकलीवर गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. जखमी वेदिकाला तात्काळ उपचारासाठी अहमदनगरला हलवले पण उपचारापूर्वी तिचा मृत्यू झाला. ही घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे गुरुवारी सकाळी घडली. सकाळी आठ वाजताच्या सुमारास वेदिका ही आपल्या राहत्या घरी अंगणात खेळत होती. तिचे वडील … Read more

प्रवरेतील शोध मोहीम थांबली ! सर्व मृतदेह सापडले, दोघांना शोधताना चौघे बुडाले, प्रशासनासह लोकप्रतिनिधीही जबाबदार, पहा इतिवृत्तांत

pravara

दोन दिवसांपासून अकोले तालुक्यातील सुगाव हाद्दीत प्रवरा नदीक्षेत्रात सुरु असणारे मृत्यूतांडव व मृतदेहांचा शोध घेण्याचे काम अखेर आज (दि. 24 मे) थांबले. नदीपात्रात पोहोताना दोघे बुडाले व त्यांना शोधण्यासाठी गेलेले तीन जवान व एक स्थानिक असे चौघे बुडून मृत्युमुखी पडले. असे सहाही जणांचे मृतदेह सापडले आहेत. चौघांचे मृतदेह यापुर्वीच सापडले होते. काल प्रवरेचे रोटेशन बंद … Read more

वैष्णवी पोवार हत्या प्रकरण : श्रीरामपूर, नेवासा येथील मठांची झडती, दोन्ही महाराज फरार

Vaishnavi Powar

वैष्णवी पोवार या तरुणीचा पन्हाळा तालुक्यातील देवठाणे येथील मठात खून झाला हा होता. हे प्रकरण राज्यभर गाजले. दरम्यान या खुनानंतर बाळकृष्ण महाराज आणि महेश महाराज हे संशयित पसार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यासाठी सिंदगाव (जि. उस्मानाबाद), श्रीरामपूर आणि नेवासा (जि. अहमदनगर) येथील मठांमध्ये जात झडती घेतली असल्याची माहिती मिळाली आहे. परंतु पोलिसांना या कोणत्याही ठिकाणी … Read more