कोपरगावचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश ! नागरिकांना मिळणार ह्या सेवा

Ahmednagar News

Ahmednagar News : राज्यात ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता; मात्र दुष्काळसदृश परिस्थिती असतानादेखील कोपरगाव मतदारसंघ यादीतून वगळण्यात आला होता. त्यामुळे आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघाचा यादीत समावेश करावा, अशी मागणी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन मतदारसंघाचा यादीत समावेश केल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली आहे. पर्जन्यछायेखाली येत असलेल्या … Read more

आदिवासी जनतेच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहू : आ.बाळासाहेब थोरात

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुका नेहेमीच पुरोगामी विचारांचा प्रभावाखाली राहिला असून राघोजी भांगरे यांच्यासारख्या क्रांतीविराच्या गावी येऊन त्यांना, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याचे भाग्य मला मिळाले असून आपण सदैव आदिवासी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे प्रतिपादन माजी महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळाचे प्रमुख आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : टोलनाक्याजवळ प्राध्यापक अपघातात ठार, ऐन सणासुदीत अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक प्रकाश सोनाजी कारखेले (वय ५५, हल्ली रा. लोणी व राहुरी) यांचा हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबत स्थानिक सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, प्रा. प्रकाश कारखेले हे गुरुवारी सायंकाळी संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी … Read more

आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग ?

Ahmednagar News

Ahmednagar News : गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून शासनाच्या वतीने आनंदाचा शिधा वितरित केला जात आहे; परंतु सर्व्हर डाऊन होत असल्याने नागरीकांच्या आनंदावर गदा येत आहे. रेशन दुकानावर तासन्तास थांबण्याची वेळ शिर्डी, साकुरीसह राहाता तालुक्यातील अनेक रेशन दुकानांत नागरीकांवर आली. आनंदाचा शिधा वेळेवर मिळाला नाही, तर त्याचा काय उपयोग? अशा उद्विग्न प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या … Read more

शिर्डी मतदार संघ सरकारी योजनांच्‍या अंमजबजावणीमध्‍ये प्रथम क्रमांकावर

सहकार चळवळीच्‍या माध्‍यमातून समाजातील शेवटच्‍या घटकाला विकासाच्‍या मुख्‍यप्रवाहात आणण्‍याचा संस्‍कार पद्मश्री डॉ.विखे पाटील यांनी दिला. हीच परंपरा जोपासत शिर्डी मतदार संघाने सदैव समाजातील शेवटच्‍या माणसाचे हित जपण्‍याचे काम केले आहे. दिवाळीच्‍या निमित्‍ताने साखर वितरणाचा उपक्रमही सामाजिकतेचा संदेश देणारा ठरला असल्‍याचे प्रतिपादन जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी केले. लोणी बुद्रूक येथे राज्‍य सरकारच्‍या वतीने … Read more

अहमदनगर भाजपमध्ये नक्की चाललंय तरी काय ? मंत्री राधाकृष्ण विखेंच्या विरोधात थेट भाजप युवानेता निवडणूक लढवणार ???

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण तस पाहिलं तर बेरकीच. दक्षिणेत सोयऱ्या धायऱ्यांचे राजकारण आणि उत्तरेत विखे घराण्याचे वर्चस्व हे समीकरण शक्यतो सर्वाना माहित आहे. विखेंनी ठरवलं तर ते आपल्या पक्षातील असला तरी त्याला पडतातच असं म्हटलं जातात व तसा आरोप मागील विधानसभेच्या निकालानंतर अनेक भाजप आमदारांनी केलाच होता. अगदी आ. राम शिंदे असोत की … Read more

खासदार सदाशिव लोखंडे यांनी १० वर्षांत संगमनेर तालुक्यात लक्ष दिले नाही

Ahmednagar News

Ahmednagar News : काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून गुंजाळवाडी-निमगाव भोजापूर, मालदाड – चिंचोली गुरव, दरेवाडी-कवठे मलकापूर व तिरंगाचौक ते मालदाड या रस्त्यांच्या कामांसाठी ३२ कोटींचा निधी मिळाला. काही ठिकाणी कामे सुरू झाले. त्यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या निधीचे श्रेय इतरांनी घेऊ नये, अशी टीका माजी सभापती सुनंदा जोर्वेकर यांनी केली.’ जोर्वेकर म्हणाल्या, आमदार थोरात यांच्या … Read more

Ahmednagar Crime : मृताच्या जागी तोतया व्यक्ती उभी करून हडपली जमीन

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : मयत व्यक्तीच्या जागी तोतया उभा करून, तसेच खोटे मुखत्यारपत्र तयार करून पिंपळगाव माळवी (ता. नगर) शिवारातील २० गुंठे जमीन हडपल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणी मारिया प्रभुणे (वय ५८, रा. आशिर्वादनगर, श्रीरामपूर) यांनी गुरूवारी कोतवाली ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांविरोधात फसवणूकीचा गुन्हा नोंदवला आहे दीपक सुभाष सुंबे (रा. आंधळे चौरे हौसिंग, भारत … Read more

Ahmednagar News : ‘ते’ कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडता आले नसते !

Ahmednagar Crime

Ahmednagar News : संगमनेर शहर पोलिस स्टेशनच्या जेलच्या बराकीत सीसीटीव्ही नाहीत. मात्र, बराकी बाहेरच्या पॅसेजमध्ये सीसीटीव्ही आहेत. बराकी बाहेर चॅनेलचे गेट आहे. आरोपी पसार झाले, त्यावेळी हे गेट फक्त लोटून घेतले होते. त्याला कुलूप नव्हते, ही माहिती समोर येत आहे. जर या चॅनेल गेटला कुलूप असते, तर आरोपींना बाहेर पडण्यास मज्जाव झाला असता. दरम्यान, संगमनेर … Read more

Ahmednagar News : निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी आरक्षित करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार असताना मी निळवंडे धरण बिनकालव्याचे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती, तर आज पाटपाण्याला मुकावे लागले नसते. निळवंडेच्या पाणीसाठ्यावर श्रीरामपूर, राहुरी व नेवासे तालुक्यांचाही हक्क असल्याने पाणी उपलब्धतेचे दाखले घेऊन शासकीय खर्चाने बांधलेले प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान, मुठेवाडगाव टेलटॅकसह ओढ्यावरील बंधारे, पाझर तलाव आदीसाठी शासनाच्या पाणी वाटप निर्णयातील … Read more

अहमदनगर : चहासाठी फोन पे वर पैसे मागितले अन कारागृहातून फरार झालेले आरोपी जाळ्यात सापडले

Ahmednagar News : संगमनेर येथे कारागृहात न्यायालयीन कोठडी मधील 4 आरोपी 8 नोव्हेंबरला कारागृहातून पळून गेले होते. या आरोपींना काल जामनेर येथून जेरबंद करण्यात आले. या आरोपींनी जेवणासाठी मित्राकडून चहावाल्याच्या फोन पे वर पैसे मागविले अन तिथेच ते फसले.व अलगद पोलिसांच्या जाळ्यात अडकले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तांत्रिक तपास करुन चार आरोपींसह त्यांना मदत … Read more

शिवीगाळ करून वाळूचा डंपर पळवून नेला ! पाच जणाविरोधात पोलिसात गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव येथील तहसीलदारांच्या वालु कोरी विरोधी पथकाने कारवाईसाठी ताब्यात घेतलेला डंपर कर्तव्यावर असलेल्या तलाठ्याला दमदाटी, धक्काबुक्की, शिवीगाळ करून पळवून नेल्याची घटना काल गुरूवारी (दि.९) पहाटे पावणेसहा वाजता कुंभारी पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी पाच जणाविरोधात कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू शेख उर्फ राजामहंमद शेख, विना नंबर … Read more

भंडारदरा धरणाच्या परीसरात अवकाळी ! भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या परीसरात व पाणलोटात अवकाळी पावसाने दणका देत भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या पावसाने आदिवासी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. अकोले तालुक्यातील भंडा- करदरा धरणाच्या पाणलोटात तसेच परिसरात गुरुवारी चार वाजेच्या सुमारास अचानक अवकाळी पाऊस पडला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भातपिकांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. … Read more

Ahmednagar News : महसूल मंत्र्यांच्याच जिल्ह्यात वाळूतस्करांची दांडगाई ! महसूल पथकातील कर्मचाऱ्यास बेदम चोपले

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात वाळू तस्करी, वाळू वाहतूक, वाळू तस्करांची दहशत या गोष्टी काही नवीन नाहीत. या गोष्टी सर्रास सुरु असल्याच्या घटना समोर आहेत. परंतु महसूलमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील असताना या कामावर जरब बसेल असे वाटत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्याला वाळू तस्कराने बेदम मारहाण केली आहे. ही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कारागृह फोडून पळालेले चारही आरोपी ताब्यात नेपाळला जाण्याची होती तयारी? धक्कादायक माहितींचा होणार उलगडा

संगमनेर येथील कारागृहातून विविध जबर गुन्ह्यातील चार आरोपी काल 8 नोव्हेंबर रोजी कारागृहाचे गज कापून फरार झाले होते. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. तसेच पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. परंतु आता अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने हे सर्व आरोपी तीस तासांत पकडले आहेत. हे आरोपी व त्यांना मदत करणारे दोघे ते सहा आरोपी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या तालुक्यातील ९६ महसूली मंडळ दुष्काळ सदृश्य जाहीर ! दुष्काळी गावांना सवलती लागू करण्याचा निर्णय

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ९६ महसूली मंडळाचा दूष्काळी गावांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला असून,या गावांना दुष्काळी परीस्थीतीत देण्यात येणाऱ्या सर्व सवलतींचा लागू होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. आज मंत्रालयातील वाॅर रुम मध्ये झालेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठकीमध्ये याबाबतचा निर्णय घेण्यात आला. … Read more

गोदावरीतून जायकवाडी धरणात पाणी सोडू नका

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली असल्याने गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान होणार असल्याने जायकवाडीला नाशिकच्या धरणातून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पावसाळ्यात पावसाने पाठ फिरवल्याने राहाता तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. शेतातील पीक पाण्याअभावी जळत असल्याने शेतकरी हताश … Read more

कांद्याला विक्रमी ५ हजार मिळाला भाव ! कांदा मार्केट बंद राहणार

Onion News

Onion News : नेवासे तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात दिवाळीच्या सुटीपूर्वी अखेरच्या दिवशी कांद्याला विक्रमी ५ हजार रुपयांचा बाजारभाव मिळाला. बुधवारी दिवसभरात १२९ वाहनांमधून २३ हजार ५८८ कांदा गोण्या विक्रीसाठी बाजारात दाखल झाल्या. एकूण कांद्याचे वजन १२ लाख ९७ हजार ३४० किलो भरले. यापैकी नवीन उन्हाळ गावरान कांद्याच्या एक दोन लॉटला ४७०० ते ५ … Read more