Ahmednagar News : नगर तालुक्यात गर्भगिरीच्या डोंगर रांगा, दुर्मिळ औषधी वनस्पतींसह दुर्लभ प्राण्यांचाही ठेवा ! हरणांसह रानडुकरांची सर्वाधिक संख्या

vanarai

Ahmednagar News : नगर तालुक्याला मोठे निसर्गसौंदर्य लाभले आहे. गर्भगिरीच्या डोंगररांगा, घनदाट वृक्ष, जंगल आदींमुळे विविध पशु पक्षी प्राण्यांचा अनमोल ठेवा सध्या नगर तालुक्यात आहे. नुकतेच तालुक्यातील जंगल भागामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी (२३ मे) वनविभागाच्या वतीने वन्य प्राण्यांची पाहणी करण्यात आली. या पाहणीत दुर्मिळ औषधी वनस्पतींसह दुर्लभ प्राणी देखील आढळून आले. दरम्यान या पाहणीमध्ये नगर … Read more

Ahmednagar News : कोल्हे, विखें सारख्या मातब्बरांच्या हट्टापायी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट?

Ahmednagar News : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या मुंबई, कोकण पदवीधर आणि मुंबई, नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर केली आहे. दरम्यान लोकसभेला एकत्र असलेल्या तिन्ही मित्र पक्षातील अनेक मातब्बर पुढारी विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत उमेदवारीसाठी हट्ट धरून बसले आहेत. त्यामुळे विधानपरिषदेच्या शिक्षक,पदवीधर निवडणुकीत महायुतीमध्ये फूट पडेल कि ही निवडणूक महायुती व महाविकास आघाडी मित्रपक्षांसह एकत्र … Read more

Ahmednagar News :बनावट कागदपत्राद्वारे नगरपरिषदेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल; नगर जिल्ह्यातील प्रकार

Ahmednagar News : शेवगाव शहराच्या पाणी योजनेच्या ठेकेदाराने बँक गॅरंटी व अनुभव प्रमाणपत्राची बनावट कागदपत्रे बनवून नगरपरिषदेची फसवणूक केल्याच्या आरोपावरून संभाजीनगर येथील ठेकेदार इंद्रायणी कन्स्ट्रक्शनचे संचालक सुनील मधुकर नागरगोजे यांच्याविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत नगरपरिषदेचे लेखापाल सुग्रीव पांडुरंग फुंदे यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियनांतर्गत शेवगाव शहरासाठी … Read more

Ahmednagar News : श्रीगोंदेतील लेंडी नालालगतच्या जमिनीचे एनए रद्द, ‘बडे’ लोक होते खरेदीदार

Ahmednagar Breaking

Ahmednagar News : शहर हद्दीत असणाऱ्या लेंडी नाला येथे पाझर तलावासाठी संपादीत केलेली जमीन अनेक बड्या लोकांनी एकत्र येत लुबाडली. ही जमीन बेकायदेशीररित्या एनए (बिनशेती) करण्यात आली. तो एनएचा आदेश आता तहसीलदारांनी रद्द केला आहे. याप्रकरणी चौकशीसाठी आंदोलनाचा इशारा बीआरएसचे समन्वयक टिळक भोस यांनी दिला आहे. दरम्यान, सदर खरेदी कायदेशीर असून एनए रद्दला आम्ही न्यायालयात … Read more

Ahmednagar Politics : विधानसभेसाठी मोठी रस्सीखेच, लोकसभेला दिलेल्या शब्दांमुळे इच्छुकांची संख्याही वाढली, जगतापांसह लंकेंच्याही जागेवर तीन पक्षांचा डोळा

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुका १३ मे ला पार पडल्या परंतु याचा निकाल येण्याआधीच विधानसभेसाठी रस्सीखेच सुरु झालीये. महायुतीमध्ये तीन पक्ष व महाविकास आघाडीतही तीन पक्ष असल्याने कोण कोणत्या जागेंवर दावा करेल हे सांगता येणे कठीण आहे. त्यातच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेला अनेक इच्छुकांना आमदारकीचा शब्द दिलेला असल्याने इच्छुकांची भाऊगर्दी देखील डोके ठरेल … Read more

Ahmednagar News : पर्यटकांच्या झुंबडीमुळे काजवा महोत्सवावर परिणाम ! अनेकांचा झाला हिरमोड

Kajwa Festival 2024

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात असणाऱ्या कळसुबाई हरिश्चंद्रगड अभायाण्यातील काजवा महोत्सव जगप्रसिद्ध झाला आहे. गत शनिवार व रविवार हा विक एंड आल्याने काजवा महोत्सव पाहण्यासाठी भंडारदऱ्याला पर्यटकांची झुंबड उडाली. दरम्यान अभयारण्य क्षेत्रामध्ये काजवे बघण्यासाठी वन्यजीव विभागाकडुन काही अटींचे बंधन घालण्यात आले होते. ही बंधने तोडण्यात आल्याने काजव्यांच्या अविष्काराचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पर्यटकांच्या … Read more

Ahmednagar News :शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू हा घातपात? ग्रामस्थांनी दिला ‘रास्तारोको’चा इशारा

shetatale

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा या गावात दि.१७ एप्रिल रोजी शेततळ्यात बुडून दोन सख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.  दरम्यान हि घटना अकस्मात नसून हा घातपाताचा प्रकार आहे, असा आरोप हिवरगाव पावसा येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा हिवरगाव पावसा टोल नाक्याजवळ रास्ता … Read more

लिंबाचे भाव गगनाला, सरबतासाठी आमसूलची मागणी, कोकम सरबताला भाव

kokam

उन्हाळ्यात लिंबाला प्रचंड मागणी असते. विशेषतः सरबतासाठी लिंबू लागते. यंदा लिंबाचे उत्पन्न घटले असल्याने व लिंबाला मोठी मागणी असल्याने भाव गगनाला भिडले आहेत. जवळपास ५० रुपये पावशेर असा भाव लिंबाला भेटत आहे. बाजारात सध्या पाच- दहा रुपयांना एक लिंबू मिळते आहे. त्यामुळे आता अनेक ठिकाणी लिंबू सरबताऐवजी सरबत बनविण्यासाठी आमसूल वापरले जात आहे. त्यामुळे सरबतासाठी … Read more

Ahmednagar News : धावत्या पिकअपमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू ; बायपासवरील घटना

Ahmednagar Accident News

Ahmednagar News : भरधाव वेगात असलेल्या पिकअप गाडीचा क्लिनर साईडचा दरवाजा अचानक उघडून क्लिनर साईडला बसलेल्या युवकाचा रस्त्यावर पडून मृत्यू झाला. हि घटना बायपास रस्त्यावरील नगर तालुक्यातील वाळूज गावच्या शिवारात सोमवारी (दि.२७) पहाटे दोन वाजेच्या सुमारास घडली. बाळाजी माधव साकटवाड (वय २९, रा. मुखेड, जि. नांदेड) असे या अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन प्रकरणी आणखी एका ‘बड्या’ व्यापाऱ्यास अटक, कोट्यवधींचं कर्ज व काही रक्कम ‘त्या’ संचालकाच्या खात्यावर केली वर्ग

Nagar Urban Bank News

Ahmednagar News : महाराष्ट्रभर गाजेलला नगर अर्बन घोटाळाप्रकरणाच्या तपासनीस आता वेग येऊ लागला आहे. अनेक लोक या प्रकरणी अटकेत असून पोलीस त्यांची कसून तपासणी करत आहेत. आता या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यापाऱ्यास पुण्यातून अटक केली आहे. त्यामुळे व्यापारीवर्गात खळबळ उडाली असून मोठी माहिती तपासात समोर येऊ शकते असे म्हटले जात आहे. अक्षय … Read more

Ahmednagar News : ससूनचा भ्रष्ट कारभार ते अहमदनगर झेडपीतील बनावट दिव्यांग कर्मचारी.. ऐकू येतेय, दिसतेय तरी अपंगत्वाचे सर्टिफिकेट

zp

Ahmednagar News : पुण्यामध्ये पोर्शे कार अपघात प्रकरणाने महाराष्ट्र ढवळून निघाला. या अपघातामुळे ससून रुग्णालयातील भ्रष्टाचार देखील समोर आला. येथील डॉक्टर पैशांच्या मोबदल्यात वैद्यकीय अहवालांतही फेरफार करत असल्याचे समोर आल्यानंतर मात्र एकच खळबळ उडाली. काही डॉक्टर सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. परंतु हे प्रकरण समोर आल्याने आणखी काही प्रकरणांना वाचा फुटण्याची शक्यता आहे. नगर जिल्हा … Read more

Ahmednagar News : पोलिसांनी केला बनावट गुटख्याचा कारखाना उद्ध्वस्त ; २२ लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ahmednagar Crime

Ahmednagar News : कोणत्या प्रकारचा गुटखा, मावा अथवा नशा करणे शरीरासाठी अपायकारकच आहे . मात्र तरीदेखील अनेकजण सर्रास मावा , गुटखा खातात.परिणामी या मधून मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याने अनेकजण शरीरासाठी घटक पदार्थ टाकतात. स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर एमआयडीसीमध्ये सुरू असलेला असाच एक बनावट गुटख्याचा कारखाना मंगळवारी उद्ध्वस्त केला. या कारवाईत पोलिसांनी गुटखा बनविण्याचे … Read more

Ahmednagar News : व्हॉटस्अपवर ठाकरे परिवाराची बदनामी, शिवसैनिक आक्रमक झाल्याने थोडासा तणाव, अहमदनगरमधील घटना

udhav thakre

Ahmednagar News : सोशल मीडिया जितकी प्रभावी तितकी घातक देखील ठरू शकते. त्यात आता AI सारखी टेक्नॉलॉजी आल्याने डीपफेक सारखी अनेक प्रकरणे देखील घडली. व्हॉटस्अॅप हे माध्यम देखील अनेक कुरापतींचे कारक ठरत असल्याचे चित्र आहे. अहमदनगरमध्ये देखील असेच एक प्रकरण समोर आले आहे. व्हॉटस्अॅप ग्रुपमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे परिवाराच्या संदर्भात त्यांची बदनामी … Read more

Ahmednagar News : ‘आषाढी वारी ‘ साठी लाल परी सज्ज ; तब्बल ४८०० एस.टी.गाड्यांची केली व्यवस्था

Ahmednagar News : आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठ्या ‘पंढरी’त येतात. यंदा ‘आषाढी वारी ‘ला १७ जून पासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर लाल परी सज्ज झाली आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी ४८०० एस.टी.गाड्यांची व्यवस्था केली आहे. १ जुलैपासून पंढरपूरकडे एस.टी. महामंडळाच्यावतीने गाड्या सोडण्यात येणार आहेत. २५ जुलै … Read more

Ahmednagar News : कोरोना सारखी आणखी एक महामारी येणार ! ब्रिटिशच्या वैज्ञानिकांनी दिला इशारा

Ahmednagar News : संपूर्ण जगाला वेठीस धरणाऱ्या कोरोना महामारीमुळे झालेले नुकसान कधीच भरून येणार नाही. कोरोनामुळे जगाच्या अर्थवस्थेवर देखील परिणाम झाले होते. त्यामुळे या महामारीचे केवळ नाव जरी घेतले तरी देखील त्या काळातील झालेल्या वेदनांची आठवण येते. परंतु याच संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना सारखी महामारी पुन्हा येण्याचा इशारा ब्रिटन सरकारचे माजी वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक … Read more

Ahmenagar News :चुलत दिराने केले माय लेकीवर कोयत्याने वार : वांबोरी येथील घटना

Ahmednagar News

Ahmenagar News : लाईटचे पोल घेण्याच्या झालेल्या वादातून तुम्ही येथून लाईटचे पोल घेऊ नका, असे म्हणत दोन महिलांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून एका मुलीवर थेट कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे घडली.याप्रकरणी तीन महिलांसह दोघे पुरुष असे पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, राहुरी तालुक्यातील … Read more

रयतचे अरूण कडू यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण तातडीने काढा ! जागा बौध्‍द विहार उभारणीसाठी मोकळी करुन देण्याची मागणी

राहुरी तालुक्‍यातील मौजे सात्रळ येथील गट नं.३७९ मधील०.२९ आर हेक्‍टर जमीनीवर रयत शिक्षण संस्‍थेचे पदाधिकारी अरूण कडू यांनी संस्थेच्या माध्यमातून केलेले अतिक्रमण तातडीने काढून जागा बौध्‍द विहार उभारणीसाठी मोकळी करुन द्यावी यासाठी आज बौध्द समाजाच्या वतीने जिल्‍हाधिका-यांना निवेदन देण्‍यात आले. या संदर्भात दिलेल्‍या निवेदनात समाज बांधवांनी म्‍हटले आहे की, सदर जागेची कागदपत्रांवर महारवाडा सात्रळ असा … Read more

संगमनेर तालुक्यात दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करा

संगमनेर तालुक्यात मागील दहा वर्षांत झालेल्या माती मिश्रीत वाळू लिलावाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करावी.तसेच सध्या सुरू असलेल्या अवैध खाण क्रशर आणि खाण पट्टे व्यवसाय बंद करावेत आशी मागणी संगमनेर तालुक्यातील शिष्टमंडळाने महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकरी सिध्दराम सालीमठ यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. संगमनेर तालुक्यातील निमोण तळेगाव कौठे कमळेश्वर येथील ग्रामस्थ आणि शेतकर्यांनी जिल्हाधिकारी यांची … Read more